Home | International | Other Country | Woman solves mystery of man who left flowers at her brother grave

भावाच्या समाधीवर रोज दिसायचे ताजे फुल, 70 वर्षांनंतर बहिणीला समजले यामागचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 02:01 PM IST

इंग्लडमध्ये एका मुलाच्या कबरीवर कुटुंबियांना नेहमी ताजे फुल ठेवलेले आढळून येत होते. सर्वजण हे फुल येथे कोण ठेवून जाते या

 • Woman solves mystery of man who left flowers at her brother grave

  चेल्टेनहेम : इंग्लडमध्ये एका मुलाच्या कबरीवर कुटुंबियांना नेहमी ताजे फुल ठेवलेले आढळून येत होते. सर्वजण हे फुल येथे कोण ठेवून जाते यामुळे अचंबित झाले होते. मुलीच्या बहिणीने त्या व्यक्तीचा शोध सुरु केल्यानंतर अनेक दशकांनी एका टीव्ही प्रोग्रॅममध्ये या गोष्टीचे सत्य बाहेर आले. हा व्यक्ती त्या मुलाचा मित्र निघाला, जो मागील 70 वर्षांपासून कबरीवर फुल ठेवत होता. हा मित्र त्या मुलाच्या मृत्यूच्या रात्री त्याच्यासोबत होता.


  तपासामध्ये हे सत्य समोर आले
  - 1947 मध्ये चेल्टेनहेम शहरात राहणार 12 वर्षांचा कार्ल शार्प एक स्काउटिंग टूरसाठी साउथ वेल्सच्या गोवर कोस्ट येथे गेला होता. याठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता आणि समुद्रातून त्याची डेडबॉडी काढण्यात आली होती.
  - त्यानंतर त्याला चेल्टेनहेमजवळील प्रेस्टबरी येथे सेंटमेरी चर्चमध्ये दफन करण्यात आले. परंतु कुटुंबीय येथे आपल्या मुलाच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना एक चकित करणारी गोष्ट दिसून येत होती.
  - हे कुटुंबीय जेव्हाही आपल्या मुलच्या कबरीजवळ येत होते तेव्हा आधीपासूनच त्यावर फुल आणि कविता ठेवलेल्या आढळून येत होत्या.
  - त्यानंतर शार्पची छोटी बहीण एन कियरने त्या व्यक्तीचा शोध सुरु केला. त्यानंतर बीबीसीने चेल्टेनहेम टाउनच्या या केसवर एक तपास सुरु केला आणि समोर हे सत्य आले.


  मित्राला आपला शोध घेत असल्याचे माहिती नव्हते
  - अनेक दशक उलटून गेल्यानंतर शार्पची बहीण कियरला समजले की, कबरीवर फुल ठेवणारा तिच्या भावाचा मित्र रोनाल्ड सेमोर वेस्टबॉरो आहे. हासुद्धा स्काउटिंग ट्रिपमध्ये त्याच्यासोबत होता.
  - रोनाल्ड वयाच्या18 व्या वर्षांपासून आता 84 वयापर्यंत शार्पच्या कबरीवर फुल ठेवत आहे. त्याने सांगितले की, ट्रीपमध्ये तो शार्पसोबत होता आणि शेवटच्या रात्रीही एकाच तंबूत दोघे झोपले होते.
  - रोनाल्डने सांगितले की, शार्पला एखादी बहीण असल्याचे मला काहीच माहिती नाही आणि ती माझा शोध घेत असल्याचेही मला माहित नाही. विशेष म्हणजे कियरला कविता कोण लिहून ठेवत आहे याविषयी अजूनही काही माहित नाही.

 • Woman solves mystery of man who left flowers at her brother grave

  शार्पच्या कबरीरवर 70 वर्षांपासून फुल ठेवणारे त्यांचे मित्र रोनाल्ड

 • Woman solves mystery of man who left flowers at her brother grave

  शार्प आणि कियरचा बालपणीचा फोटो

 • Woman solves mystery of man who left flowers at her brother grave
 • Woman solves mystery of man who left flowers at her brother grave

  शार्पचा बालपणीचा फोटो

Trending