आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीला एकटी पाहून घरात घुसले दीर: आधी नग्न करून केली मारहण, मग केस कापले; जाताना देऊन गेले अशी धमकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - येथील एका महिलेने आपल्या दीरांवर आणि त्यांच्या मित्रांवर गंभीर आरोप लावून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. होमगार्डची पत्नी असलेल्या या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला दीर आणि मित्रांनी घरात घुसून विवस्त्र करत मारहाण केली. यानंतर सर्वांनी बळजबरी पकडून तिचे केस कापले. आरोपी आपल्यासोबत स्थानिक गुंडांना घेऊन घरात घुसले होती. पीडितेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिला अमानुष यातना दिल्या. यानंतर जाताना सुद्धा कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली.


महिलेने रडतानाच सांगितली आपबिती
कानपूरच्या काकादेव हद्दीत असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती होमगार्ड आहे. ती आपल्या पती आणि दोन मुलांसोबत याच परिसरात राहते. पती ड्युटीवर आणि मुले बाहेर गेले असताना बुधवारी दीर राकेश गौड आणि दिनेश गौड अचानक घरात घुसले. त्यांच्यासोबत गावगुंड शिवम, सुमित रामराज आणि प्रदीप सुद्धा होते. त्यांनी घरात घुसताच आतून कडी लावली आणि पीडितेला एका खोलीत बंद केले. याच ठिकाणी सर्वांनी तिच्यावर बळजबरी करून कपडे काढले. निर्वस्त्र अवस्थेत तिला बेदम मारहाण केली. यानंतर कात्रीने तिचे केस कापले. जाताना कुणालाही आमची नावे सांगितल्यास जीवे मारू अशी धमकी त्यांनी दिली. पीडितेने रडता-रडता आपली आपबिती पोलिसांना सांगितली.


एकाच घरात राहतात दीर-भावजई
महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे कुटुंब आणि आरोपी दीरांचे कुटुंब एकाच घरात राहतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात घराच्या मालकीवरून वाद सुरू आहेत. याच वादात त्यांनी अनेकवेळा घराबाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला. पण, बुधवारच्या संध्याकाळी त्यांनी सर्वच हद्द पार केल्या. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच आरोपी दीरांचा सध्या शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले.

 

बातम्या आणखी आहेत...