आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगात भरली मिरची पूड; Viral Video नंतर पोलिसांना जाग, 19 जण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीमगंज - आसामात संतप्त जमावाने अवैध दारु विक्री करणाऱ्या एका महिलेला माणुसकीला काळीमा लावणारी शिक्षा दिली आहे. गावकऱ्यांनी त्या महिलेले पकडून आधी तिला विवस्त्र करून लज्जित केले. यानंतर तिच्या गुप्तांगात मिर्ची पूड भरली. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ फिरत आहे. त्यामध्ये महिलेच्या किंकाळ्यांनी कानठळ्या बसतील. ही धक्कादायक घटना आसामच्या करीमगंज येथे घडली. त्यातही आणखी धक्कादायक म्हणजे, या प्रकरणी ज्या 19 गावकऱ्यांना अटक करण्यात आली, त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. 


करीमगंजचे पोलिस अधीक्षक गौरव उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे, ही घटना आसाम-मिझोरम सीमावर्ती भागापासून काही अंतरावर असलेल्या एका आदिवासी गावात घडली आहे. 10 सप्टेंबर रोजीच्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल करताना पीडितेची सुद्धा भेट घेण्यात आली नाही. यानंतर घटस्थळी पोलिस पथक पाठवून सविस्तर तपास करण्यात आला. यानंतरच पीडितेचा पोलिसांशी सामना झाला. 


पीडितेने सांगितल्याप्रमाणे, हल्ला अचानक झाल्याने तिला काहीच सुचले नाही. हल्लेखोर गावकरी तिच्या घराचे दार तोडून घुसले होती. सर्वांनी मिळून तिला बेदम मारहाण केली आणि तिचे कपडे काढले. यानंतर गावातील महिलांनी तिच्या खासगी अंगांमध्ये मिरची पूड भरली. पीडित महिला विधवा असून आपल्या सासरवाडीत राहते. प्रथमदृष्ट्या या महिलेच्या अवैध दारु विक्रीवरून हा वाद झाला असे दिसून येते. परंतु, पोलिसांनी 19 संशयित आरोपींना अटक करून याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...