आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Southwest Airlines Flight Which Killed A Woman, After Its Window Cracked And She Pulled Out Of It

32 हजार फुटांवर तुटली विमानाची खिडकी, सीटावर बसलेल्या महिलेचे डोके बाहेर ओढले, इतर प्रवाशांनी ओढायचा प्रयत्न केला परंतु...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युयॉर्क- एप्रिलमध्ये न्युयॉर्कमधील साऊथ वेस्ट एयरलाईन्सच्या विमानाची खिडकी तुटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बुधवारी या घटनेची सुनावणी सुरू झाली आहे. 17 एप्रिल 2018 रोजी न्युयॉर्कवरून डलासला जाणाऱ्या एका विमान कंपनीचे 1380 हे विमान पेन्सिलवेनिया शहरावरून जात होते. विमान 32 हजार फुट उंचीवर असताना अचानक विमानाच्या एका इंजिनाचा स्फोट झाला. स्फोटात  विमानाची एक खिडकी तुटल्याने खिडकी शेजारी बसलेल्या महिलेचे डोके बाहेर ओढल्या गेले. जेनिफर रिऑर्डन असे महिलेचे नाव असून हवेचा दाब जास्त असल्याने तिची मान खिडकीत अडकली. इतर प्रवाशांनी तिला पकडून आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला परंतु खिडकीच्या तुटलेल्या काचांमुळे जेनिफरला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.

 

5 मिनिटांमध्ये 22 हजार फुट खाली आले विमान

> स्फोट झाल्यानंतर पायलेटने विमानाला लँड करण्याचा निर्णय घेतला आणि 5 मिनीटांमध्ये विमानाला 36 हजार फुटांवरून 14 हजार फुटांवर आणले. पायलेटच्या सतर्कतेमुळे त्याने विमानाला परत फिरवून फिलाडेलफिया विमानतळावर उतरवले. परंतु तेवढ्या वेळेत मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याने जेनिफरचा मृत्यू झाला होता.

 

6 महीन्यांनतर समोर आले इंजिन स्फोटाचे कारण

> नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या सुनावणीत समोर आले की, विमानाच्या इंजिनमध्ये असलेल्या फॅनचे ब्लेड अनेक वर्षांपासून तपासले नव्हते. विमानाची साफसफाई केली जात होती परंतु विमानाच्या इंजिनमधील पार्टच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने त्यात बिघाड झाला होता. फॅनचे ब्लेड 2012 मध्ये तपासण्यात आले होते त्यानंतर आतापर्यंत त्याची दुरुस्ती झालीच नव्हती. या स्फोटामध्ये फॅनचा पार्ट तुटून विमानाच्या खिडकीला लागल्याने जेनिफरचा मृत्यू झाला. 
> या अपघातात पायलेटच्या सर्तकतेमुळे 143 प्रवाशांचे प्राण वाचले. कारण विमान 40 अंशापर्यंत वाकल्याने विमान कोसळ्याची शक्यता होती.

बातम्या आणखी आहेत...