आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची आत्महत्या, अंत्यविधीवेळी नातेवाइकांची दगडफेक; 6 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई  - नवविवाहितेच्या मृतदेहावर पोलिस बंदोबस्तात शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत असताना विवाहितेच्या  पतीसह सासरच्या लोकास  मारहाण केली. काही वेळातच  मारहाणीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन गोंधळ उडाला.  दगडफेकीत  सहा जण जखमी झाले. दरम्यान, नातेवाइकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता  गेवराई येथील स्मशानभूमीत घडली. दरम्यान जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.


शहरातील संजय नगरातील संभाजी पवार (२४) हा पुण्याच्या वाघोलीत वाहन चालक म्हणून काम करतो. पाच महिन्यापूर्वी संभाजीशी शिवणी येथील  रेखा  (२०) हिच्याशी विवाह झाला होता. दरम्यान, संभाजी पवार व रेखा वाघोलीत राहू लागले.  ४ मार्च  रोजी  रेखाने   गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


पती त्रास देत होता
शुक्रवारी सकाळी गेवराई शहरातील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. मात्र मृत महिलेच्या नातेवाइकांनी विवाहितेचा पती  संभाजी पवार हा त्रास देत असल्यानेच आपल्या मुलीने आत्महत्या केली  असे म्हणून आक्रमक झाले होते. त्यामुळे स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्त वाढवला.  विवाहितेच्या चितेला भडाग्नी देताच शिवणीच्या नातेवाइकांनी आक्रमक होऊन  पतीसह अन्य नातेवाइकांवर  दगडफेक  केली.  दगडफेकीत संभाजी पवार, त्याचा भाऊ व  महिलांसह सहा जण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...