आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाने सहा, भारताने दाेन वेळा जिंकली टी-20ची फायनल

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मेलबर्न - पहिल्याच प्रयत्नात विश्वविजेता हाेण्यासाठी भारताचा महिला संघ उत्सुक आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवण्याचा भारताच्या टीमचा मानस आहे. यासाठी उद्या रविवारी भारताचा महिला संघ टी-२० वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. भारत आणि चार वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघात अंतिम सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ वर्ल्डकप ट्राॅफीचा मानकरी ठरणार आहे.  यजमान ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसेच, या संघाने टी-२० फाॅरमॅटच्या सर्वाधिक सहा फायनल जिंकल्या आहेत. दुसरीकडे भारताच्या संघाने याच फाॅरमॅटच्या दाेन फायनल जिंकल्या. मात्र, भारताचा महिला संघ टी-२० वर्ल्डकपची फायनल पहिल्यांदाच खेळत आहे.

वेदाच्या मते- लकची साथ; आम्ही काेणत्याही दबावाशिवाय खेळणार
महिला दिनाच्याच दिवशी फायनल रंगणार आहे. त्यामुळे इतिहास रचण्यासाठी आमच्यासाठी ही याेग्य वेळ आणि माेठी संधी आहे. याच संधीचे साेने करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यातील विजयासाठी आम्हाला नक्कीच लकची साथ मिळणार आहे. त्यामुळे चार वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फायनलमध्ये आम्ही काेणत्याही दबावाशिवाय खेळणार आहाेत. यासाठी आमच्या टीमने कसून मेहनत घेतली. याच सरावातून आम्हाला विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठता येईल, असा विश्वास भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने व्यक्त केला. याशिवाय आम्ही कर्णधार हरमनप्रीतला वर्ल्डकप ट्राॅफीचे बर्थ डे गिफ्ट देण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने यादरम्यान सांगितले.

कॉटन व पाकचेे एहसान असणार पंच
वर्ल्डकपच्या या फायनल सामन्यात न्यूझीलंडची किम काॅटन आणि पाकचे एहसान रजा हे दाेघेही पंचगिरी करणार आहेत. ४२ वर्षीय काॅटन यांनी विश्वचषकातील चार सामन्यांत ही भूमिका यशस्वीपणे बजावली आहे. त्यामुळे त्यांची निवड झाली.

फायनलला चाहत्यांची गर्दी; ८० हजार तिकिटांची विक्री
जागतिक महिलादिनी रविवारी विश्वविजेता हाेण्यासाठी दाेन देशांचे महिला क्रिकेट संघ मेलबर्नच्या मैदानावर झुंजणार आहेत. हीच फायनल झुंज पाहण्यासाठी चाहत्यांची माेठी गर्दी असणार आहे. कारण, आतापर्यंत या सामन्यासाठी ८० हजार तिकिटांची विक्री झाली. ९० हजार या स्टेडियमची आसनक्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...