आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Teacher Making Physical Relation With Student

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत बनवत होती संबंध, आता झाला चकित करणारा खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चंडीगड : चंडीगडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थीच्या नात्याला काळीमा फासणारी गोष्ट समोर आली आहे. येथे एका ट्यूशन टीचर अनेक दिवसांपासून आपल्या विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध ठेवत होती. याबाबत कोणाला काहीच माहीत नव्हते. पण विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती कमी झाल्यानंतर हा हैराण करणारा खुलासा झाला. 

 

14 वर्षीय मुलासोबत संबंध बनवत होती शिक्षीका

चंडीगडमध्ये 34 वर्षीय शिक्षीका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीसोबत तीन महिन्यांपासून संबंध प्रस्थापित करत होती. मुलाला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाल्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला. मुलाची शालेय प्रगती खालावल्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या ठिकाणी ट्यूशन सुरू करण्याचे ठरवले होते. ही बाब महिला शिक्षीकाला समजताच तिने विद्यार्थीचे घर गाठले आणि विद्यार्थीने तिला सोडून इतरत्र ट्यूशन लावू नये यासाठी खूप प्रयत्न केला. पण कुटुंबीयांनी ऐकले नसल्यामुळे तिने तिथेच विष प्राशन केले. पोलिस आणि चाइल्ड हेल्पलाइनकडे हे प्रकरण गेल्यानंतर संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला. 

 

सरकारी शाळेत आहे शिक्षीका 

पीडित परिवाराच्या मते, आरोपी महिला सरकारी शाळेत विज्ञान विषयाची शिक्षीका आहे. महिलेचा पती प्राध्यापर असून तिला दोन अपत्य देखील आहेत. तिच्या घराजवळच राहणाऱ्या दोन भावंडांनी तिच्याकडे टूशन सुरू केली होती. सप्टेंबर महिन्यापासून ते तिच्याकडे शिकायला जात होते. एक दिवस अचानक शिक्षीकेने मुलाला बहिणीला सोबत न आणण्यास सांगितले. यानंतर मुलाच्या बहिणीचे ट्यूशनला जायचे बंद झाले. यानंतर महिलेने गलिच्छ षड्यंत्र रचले आणि मुलासोबत संबंध प्रस्थापित केले. 

 

पोलिसांनी केली अटक 
पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी आरोपी शिक्षीकेला अटक केली DSP हरजीत कौरने सांगितले की, मुलाने दिलेल्या जबाबानुसार महिलेने मार्च 2018 मध्ये घरात कोणी नसताना त्याच्यासोबत पहिल्यांदा संबंध बनवले होते. यानंतर पोलिसांनी महिलेवर पॉक्सो कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.