आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर खेळत होता डॉगी, जेव्हा परतला तेव्हा होत्या शरीरावर विचित्र खुणा, मालकाला वाटले एखाद्या किड्याने घेतला असेल चावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेमोरः अमेरिकेत एका डॉगीसोबत अतिशय विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. इंग्लिश मास्टिफ ब्रीड जातीचा डॉगी जॅक्सन आपल्या मालकाच्या घराबाहेर खेळायला गेला होता. पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरावर विचित्र खुणा होत्या. एखाद्या किड्याने चावा घेतला असावा, असे मालकाला वाटले. पण जेव्हा जॅक्सनला बारकाइने बघितले तेव्हा त्यामागे गंभीर कारण असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या शरीरावर अनेक गोळ्या लागल्या होत्या.


डॉगीच्या शरीरातून निघाले होते 27 छर्रे
-  ही घटने गेल्यावर्षी होवार्ड फॅमिलीच्या डॉगीसोबत घडली होती. इंडियाना स्टेटच्या सेमोर येथे होवार्ड फॅमिली वास्तव्याला आहे. तर त्यांचा डॉगी जॅक्सन घरातील एक अविभाज्य भाग आहे.
- जॅक्सन दररोज घराच्या अंगणात फिरायला आणि खेळायला जात होता. घटनेच्या दिवशीही तो घराबाहेर खेळत होता. 
- पण जॅक्सन जेव्हा घरी परतला, तेव्हा त्याची अवस्था बघून त्याची मालकिण हेडन अतिशय घाबरली. त्याच्या शरीरावर जागोजागी चावा घेतल्यासारख्या खुणा होत्या.
- हेडन यांना प्रथमदर्शनी जॅक्सनचा एखाद्या किड्याने चावा घेतला असावा, असे वाटले होते, पण जेव्हा त्यांनी लक्षपूर्वक बघितले, तेव्हा त्याच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खुणा होत्या. हे बघून हेडन त्यांच्या डॉगीला तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन गेल्या.

- डॉक्टर यांनी जेव्हा जॅक्सनला तपासले तेव्हा त्यांची शंका खरी ठरली. जॅक्सनच्या शरीरावर छर्रे लागले होते. 
- डॉक्टरांनी जॅक्सनच्या शरीरातून तब्बल 27  छर्रे काढले आणि 20 छर्रे तसेच राहू दिले. कारण हे छर्रे त्याच्या शरीराच्या आत गेले नव्हते.
 

 

आरोपी पकडला गेला...

- हेडन यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना आरोपीला शोधायला फार उशीर लागला नाही. डॉगी ज्या ठिकाणी खेळत होता, त्या ठिकाणावरुन पोलिसांनी अंदाज बांधला की, छर्रे कुठल्या दिशेने आले असतील.

- त्यानंतर पोलिसांनी शेजारीवर शंका व्यक्त करुन त्याच्या घराची झडती घेतली. शेजा-याच्या घरात बंदूक आणि छर्रे पोलिसांना मिळाले.
- हेडन यांचा शेजारी टॉम वुडवर्ड हाच आरोपी निघाला. त्याने क्रूरपणे डॉगीवर बंदूकीतून छर्रे झाडले होते. त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी त्याला ड्रग्स प्रकरणीही अटक झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  

 

बातम्या आणखी आहेत...