आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांपासून महिलेला बध्दकोष्ठ आणि थकव्याची होती समस्या, डॉक्टरांना दाखवल्यावर समोर आले वेगळेच सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लँकशायर. इंग्लंडमध्ये राहणा-या एका महिलेला नेहमी थकवा जाणवत होता, तिला अनेक वेळा बध्दकोष्ठतेची समस्या राहत होती. तिला वाटले की, पाठदुखीमुळे ती गोळ्या खात होती आणि यामुळेच असे होते आहे. याच काळात तिच्या टॉयलेटमध्ये ब्लड येऊ लागले. तेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. सुरुवातीला तिला अल्सर असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर दुसरेच सत्य समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिला एनल कन्सर झाला आहे. या आजाराविषयी महिलेने  यापुर्वी ऐकलेही नव्हते. 


कन्सरमुळे कॉन्स्टिपेशन 
- लँकशाय येथे राहणा-या लेस्लीने सांगितले की, गेल्या 2 वर्षांपासून तिला कॉन्स्टिपेशनची समस्या आहेत. तिला वाटत होते की, सर्व काही औषधांमुळे होते.

- याच्या काही दिवसानंतर तिला गुद्वारातून रक्त स्त्राव सुरु झाला. लेस्लीने सांगितले की, हे ब्लड खुप फ्रेश वाटत होते, यामुळे मी विचार केला की, घाबरण्याचे कारण नाही.
- काही दिवसानंतर खुप जास्त ब्लीडिंग होऊ लागली, तिने डॉक्टरांना दाखवले तर त्यांनी तिला बध्दकोष्ठतेचे औषध दिले. नंतर हे सर्व गंभीर झाले. नंतर तिला बसता येणेही कठीण झाले. 

कँसरचे झाले निदान 
- गेल्या वर्षी जूनमध्ये लेस्लीने अजुन काही टेस्ट्स केले. यानंतर पहिले अल्सर आणि नंतर एनल कँसर असल्याचे समोर आले.
- लेस्लीने सांगितले की, मला एनल कन्सर आहे, यावर डॉक्टरसुध्दा सुरुवातीला कन्फर्म नव्हते. हे ठरवण्यासाठी 6 आठवडे लागले. 
- ती म्हणाली की, मी यापुर्वी एनल कॅन्सरविषयी ऐकले नव्हते. यामुळे हा माझ्यासाठी खुप मोठा धक्का होता. 

 

लोकांना जागरुक करणे आवश्यक 
- लेस्लीची ट्रीटमेंट गेल्यावर्षी अक्टोबरमध्ये पुर्ण झाली आणि आता ती चांगल्या स्थितीत आहे. ती आता तिच्या जॉबवर परतली आहे. आता ती ईस्ट लँकशायर हॉस्पाइससोबत कँसर फाउंडेशनसाठी फंड जमा करतेय.

बातम्या आणखी आहेत...