आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला गरोदरपणात पोटावरील तिळाला येत होती खाज, पण महिलेने त्याकडे केले दुर्लक्ष; पण त्रास अति वाढल्यामुळे पोहोचली डॉक्टरांकडे, मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर तिला बसला मोठा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिर्केनहेड : इंग्लंडमध्ये राहणारी एक महिला स्वतःच्या पोटावर होत असलेल्या खाजेला साधारण समजत होती. खरंतर ती खाज कॅन्सरमुळे होत होती. ती गरोदर असतानाच तिला खाज येत होती. पण तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण डिलीवरीनंतरही खाज थांबली नव्हती. अखेर ती डॉक्टरांकडे गेली. तेथे गेल्यावर ती खाज कॅन्सरमुळे असल्याचे तिला माहीत झाले. तोपर्यंत जास्त उशीर झाला नव्हता. शरीरावरील तिळात कोणता बदल झाला तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे असे तिचे पिता सांगत होते आणि ते खरे देखील ठरले. 


पोटावरील तिळावर येत होती खाज

> इंग्लंडच्या बिर्केनहेड शहरातील लॉरी मर्फी या महिलेची ही गोष्ट आहे. ती ऑस्कर(5) आणि ओलिवर(1) या आपल्या दोन मुलांसोबत राहते. लॉरी गेल्या वर्षी ओलिवरच्या जन्मावेळी 6 महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटावर असलेल्या तिळावर अचानक भयंकर खाज येत होती. 
> गरोदर काळात त्वचा पसरत असल्यामुळे खाज येत असल्याचे समजत तिने याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी तिच्या शरीरावर अनेक तिळ आणि इतर डाग होते. पण यापूर्वी त्यांवर असा कोणताही त्रास होत नव्हता. 

> काही महिन्यांनंतर ओलिवरचा जन्म झाला पण त्यानंतरही तिचा त्रास कमी झाला नाही. अखेर तिला या सर्वाची भीती वाटली आणि ती तत्काळ डॉक्टरांकडे गेली. 
 > डॉक्टरांनी महिलेच्या तिळाची तपासणी करून सर्जरी करून तो काढून टाकला. तोपर्यंतही कॅन्सरविषयी काही माहीत झाले नव्हते. दोन आठवड्यानंतर वैद्यकिय अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला तडक रूग्णालयात बोलावून घेतले आणि तिला मेलानोमा (त्वचेचा कॅन्सर) झाल्याचे सांगितले. 

 

वडिलांनी सांगितलेली गोष्ट ठरली खरी

> महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी एक-एक करत तिच्या शरीरावरील सहा तिळ काढून टाकले. सध्या महिला पूर्णपण ठीक झाली आहे. पण तरीही आवश्यकता भासल्यास शरीरावरील इतर तिळही काढावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लॉरीला चेकअपसाठी दरवेळी हॉस्पिटलमध्ये जावे लागते.  
> महिलेनी सांगितले की, तिच्या वडिलांना देखील स्किन कॅन्सर होता. पण आजार पसरण्यापूर्वीचे माहीत झाले. तिचे वडिल तिला नेहमीच तिळासंबंधी तपासणी करण्यास सांगत होते. शरीरावरील तिळात कधीही काहीही बदल झाला तर डॉक्टरांकडे तपासणी करून घे असे तिला सांगत होते. 
> आता लॉरी म्हणते की, मी खूप आनंदी आहे. माझ्या वडिलांनी ही गोष्ट मला सांगितली. अन्यथा मी कधीच डॉक्टरांकडे गेले नसते. कॅन्सर ऐवजी तिच्या शरीरावरील सर्व तिळ काढणार असल्याचे तिने सांगितले. 
> जास्तवेळ उन्हात राहिल्यामुळे तिला हा आजार झाला असल्याचे लॉरीने सांगितले. ती म्हणाली की, मी तरूण असाताना खूपवेळ सन बाथ घेत होते. यामुळेच मला हा त्रास झाला आहे.  

बातम्या आणखी आहेत...