आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याला मायग्रेन समजून दुर्लक्ष करत होती महिला, ते तपासल्यावर डॉक्टर म्हणाले- आता वेळ निघून गेली, फक्त 24 तास उरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही कहाणी 'मेडिकल सायन्स' सिरीजवर आधारित आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी संबंधित अनेक रिअल लाइफ शॉकिंग स्टोरीज आहेत, ज्या जाणून घेतल्यावर आपण जागरूक होऊ शकता.)
 

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियाच्या रेनी विलियमसनला डोकेदुखीचा त्रास होता. परंतु जेव्हा डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की, ज्याला त्या डोकेदुखी समजत आहेत, त्यामुळे पुढच्या 24 तासांत त्यांचा जीव जाणार आहे. हे ऐकताच रेनीच्या पायाखालची वाळूच सरकली. घाईगडबडीत डॉक्टरांनी रेनीला रुग्णालयात दाखल केले. तपासणीत कळले की, खूप दुर्मिळ प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे. रेनी आणि तिचा पती एकमेकांकडून मोठमोठ्याने रडू लागले. रेनी स्वत:लाच दोष देऊ लागली की, एवढ्या वर्षांपासून तिला हा आजार होता, तिने त्याला मायग्रेन समजण्याची चूकच कशी केली! 

 

24 तासांत झाला असता मृत्यू...
- डॉक्टरांनी सांगितले की, रेनीला असा ट्यूमर होता, जो 24 तासांत काढला नसता तर रुग्णाचा मृत्यू अटळ होता.

 

ऑपरेशनसाठी विकावे लागले घर
- आपल्या डोकेदुखीमुळे रेनीला आधी आपला जॉब सोडावा लागला होता, दुसरीकडे या जीवघेण्या ट्यूमरच्या उपचारांमुळे त्या बरबाद झाल्या. याचे उपचार महागडे होते, एवढे की, त्यांना आपले राहते घरही विकावे लागले. रेनी 5 दिवसांपर्यंत अॅडमिट होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातून एक मोठा ट्यूमर काढला, जो त्यांच्या मानेच्या वरच्या भागापर्यंत पसरला होता. यानंतर तो भाग डॉक्टरांनी शिवला.

 

अचानक होऊ लागला स्राव
- ट्यूमर काढल्यानंतरही रेनी धोक्याबाहेर नव्हती. तिला डिस्चार्ज करून घरी जाऊ देण्यात आले, परंतु टाके घातलेल्या जागेवरून काहीतरी स्राव होऊ लागला. हे पाहून रेनी आणि त्यांचा पती घाबरले. रेनीला पुन्हा अॅडमिट करण्यात आले, तेथे तिचे आणखी एक ऑपरेशन झाले. 

 

जगातील सर्वात मोठी चूक केली
- या घटनेमुळे मोडून पडलेल्या रेनीने सांगितले की, त्या अनेक वर्षांपासून या आजाराने त्रस्त होत्या. मागच्या काही दिवसांपासून हा त्रास खूप वाढला, यामुळे त्यांनी बहिणीला याबाबत विचारले. रेनीच्या बहिणीलाही मायग्रेनचा त्रास होता. यामुळे तिलाही वाटले की, रेनीलाही सारखाच त्रास असावा. नंतर एका परिचिताने त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला, यात ब्रेन ट्यूमर असण्याचा खुलासा झाला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...