आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात भुताटकीच्या घटनांमुळे त्रस्त होती तरुणी, एक दिवस वैतागून विचारले कोण आहे? अन् खरोखर कपाटातून आला आवाज!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतात एक अजब घटना समोर आली आहे. ग्रीन्सबोरो शहरात एक तरुणी आपल्या अपार्टमेंटमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांमध्ये भयभीत होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे आपल्या घरात नक्कीच भूत असल्याचे तिला वाटत होते. काही दिवसांतच तिला आपल्या कपाटातून कपडे गायब होत असल्याचे दिसून आले. एक दिवस तर तिला आपल्या बाथरुममध्ये अनोळखी व्यक्तीच्या हातांचे ठसे सापडले. दिवसेंदिवस या घटना वाढत गेल्या आणि तिने वैतागून अखेर या कथित भूताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रागात तिने जो कुणी असेल समोर या अशी विचारणा केली तेव्हा खरोखर तिच्या कपाटातून उत्तर मिळाले.


कोण होता तो?
मॅडी नावाच्या या तरुणीने आपली आपबिती अमेरिकेतील स्थानिक माध्यमांसमोर मांडली. तिने सांगितल्याप्रमाणे, तो आवाज काही भूताचा नाही, तर एका माणसाचा होता. त्याने दबक्या आवाजात आपले नाव ड्रिऊ असे सांगितले. राहण्यासाठी घर नसलेला ड्रिऊ गेल्या कित्येक दिवसांपासून मॅडीच्या कपाटात राहत होता. मॅडी घरात असताना कपाटात लपून राहणे आणि मॅडी घराबाहेर पडताच बाहेर येऊन बाथरुम, वॉशरुम वापरणे किंवा किचनमध्ये जाऊन उरलेले जेवून घेणे हीच त्याची दिनचर्या होती. मॅडीने कपाट उघडले तेव्हा तो हात बांधून जमीनीवर बसला. त्याच्या अंगावर मॅडीचे कपडे होते. कपाटातून गायब होणारे कपडे तोच घालायचा. बाहेर आल्यानंतर तो मॅडीला विनवण्या करत होता, की प्लीज पोलिसांना बोलवू नकोस. मला माफ कर, मी येथून चुप-चाप निघून जाईन आणि परत कधीच येणार नाही.


आधी दया आली, मग...
मॅडीला वाटले की हा तरुण बेघर आणि विवश आहे. सुरुवातीला तिने त्याची मदत करण्याचा आणि माफ करण्याचाही विचार केला. परंतु, मॅडीने नरमाईची भूमिका घेताच त्याचे वर्तन बदलले. तो अचानक निर्भीळ झाला. उठून आरसा पाहणे, इकडून तिकडे फिरणे, किचनमध्ये जाऊन जेवण शोधणे अशा विचित्र हालचाली करत होता. मग, अचानक मॅडीला सांगितले, की "तू खूप सुंदर आहेस. मी तुला मिठी मारू शकतो का?" मॅडीला आपली चूक लक्षात आली आणि तिने ड्रिऊला बोलण्यात व्यस्त करत बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग सुरू केली. चॅटिंगमध्येच त्याला संपूर्ण किस्सा सांगितला. यानंतर तिचा बॉयफ्रेंड पोलिसांना घेऊन आला आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. मॅडी ज्या घरात राहत होती ते घर भाड्याचे होते. आता तिने हे घर सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...