Home | Khabrein Jara Hat Ke | Woman unable to hear mens voice

'अगं बाई... अरेच्चा!' - या महिलेला ऐकू येतो फक्त स्त्रीयांचा आवाज, अचानक झोपेतून उठल्यानंतर पुरुषांचा आवाज ऐकू येणे झाले बंद.....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:20 AM IST

डॉक्टर्सने सांगितला असा आजार की विश्वास ठेवणे झाले कठीण, आपणही करत आहोत असाच निष्काळजीपणा

 • Woman unable to hear mens voice

  बीजिंग : चीनमधील एका महिलेला फक्त स्त्रीयांचाच आवाज ऐकू येत आहे. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिला प्रियकराचा आवाज ऐकू येत नव्हता. याबाबत तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे गेली असता तेथे मात्र लेडी डॉक्टरचा आवाज ऐकू येत होता. तपासणीनंतर तिला लो-फ्रिक्वेंसी हिअरिंग लॉसची समस्या असल्याचे सांगण्यात आले. हजारो लोकांमधून एकाला ही समस्या होत असते.

  एका सकाळी झोपेतून उठली तर पुरुषांचा आवाज ऐकू येणे झाले बंद

  > चीनच्या श्यामेन शहरात राहणारी चेन एके दिवशी झोपेतून उठली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण तिला तिच्या प्रियकराचा आवाजच ऐकू येत नव्हता. पण आदल्या रात्री झोपण्यापूर्वी सर्व काही सुरळीत सुरू होते आणि ती सर्वांचे आवाज ऐकू शकत होती.
  > चेनला वाटले की, ती बहिरी झाली आहे. पण डॉक्टरांकडे गेल्यावर तिला वेगळीच गोष्ट माहीत झाली. खरंतर चेनला महिला डॉक्टरचा एक-ना-एक शब्द ऐकू येत होता. पण तेथे उभ्या असलेल्या पुरुषांचा आवाज तिच्या कानावर पडत नव्हता.

  > डॉक्टर लिन शियोक्विंग यांनी सांगितले की, चेनला लो-फ्रिक्वेंसी हिअरिंग लॉस नावाचा आजार झाला आहे. यालाच रिव्हर्स स्लोप हिअरिंग लॉस नावाने ओळखल्या जाते. डॉक्टरांच्या मते 13 हजार लोकांमधून एकाला ही समस्या उद्भवत असते.

  अचानक कानात ऐकू येत होता घंटा नाद

  > चेनने सांगितले की, एका रात्री अचानकपणे मला घंट्यांचा आवाज ऐकू येत होता. सोबतच उल्टीचा त्रास देखील झाला होता. मला वाटेल की झोप पूर्ण झाल्यास ही अडचण दूर होईल. यानंतर मी प्रियकरासोबत झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला ब्वॉयफ्रेंडचा आवाज ऐकु येत नव्हता.

  > डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, चेन माझी प्रत्येक गोष्ट ऐकू शकते. पण ती एका मुलाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ऐकू आले नाही. डॉक्टरांच्या मते, जास्त तनाव घेतल्यामुळे चेनला ही समस्या जडली आहे.. ती रात्री उशिरापर्यंत काम करत असते आणि त्यानंतर पूर्पपणे झोपही घेत नाही. असे असले तरी तिचा लवकरच पूर्णपण ठीप होणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

Trending