आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वेटरने ग्राहकास २० हजारांऐवजी ३.५ लाख रुपयांची दिली वाइन; हैराण करणारी होती मालकाची प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये एका बारमध्ये ग्राहकाने २९० डाॅलरची (२० हजार रु.) वाइनची बाटली अाॅर्डर केली. परंतु महिला वेटरने त्याला ५ हजार डाॅलरची (३.५ लाख रुपये) वाइनची बाटली अाणून दिली. दाेन्ही बाटल्या दिसण्यास सारख्याच दिसत हाेत्या. त्यामुळे वेटरची चूक झाली. विशेष म्हणजे तिच्या चुकीवर मालकाने नाराजी दर्शवली नाही. त्याने टि्वट करताना या घटनेचा उल्लेख करत ग्राहकास म्हटले, तुम्हाला खूप अानंद मिळाला असेल. तर कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले, अशी चूक घडूनही आम्ही नाेकरांवर प्रेमच करताे. त्यांच्याकडून अशी चूक पुन्हा हाेणार नाही अशी अपेक्षा. काही लाेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु रेस्तराँने उत्तर देताना माेठ्या अक्षरात लिहिले, दाेन्ही बाटल्या दिसण्यास एकसारख्या हाेत्या. यामुळे वेटरने चुकून दुसरी बाटली उचलली हाेती.

बातम्या आणखी आहेत...