आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
साउथेम्पटन - येथील एका महिलेला आपल्या बाळाला दूध पाजून त्याच्या बाजूला झोपणे महागात पडले. 20 वर्षीय सिंगल मदरने आपल्या बाळाला दूध पाजून स्वतःच्या बाजूला झोपवले पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ते मूल बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. रोवन लीच असे या आईचे नाव आहे.
मुलाला पलंगावर झोपवणे पडले महाग
> याबाबत महिला सांगते की, रात्री 3 वाजेच्या सुमारास माझी झोप मोडली होती. यामुळे मी हेडलीला दूध पाजण्यासाठी त्याला पाळण्यातून पलंगावर घेतले. त्याला दूध पाजत असताना अचानक मला चक्कर आली. यामुळे मी तिथेच झोपी गेले. दरम्यान हेडली माझ्या बाजूला होता.
> दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मला जाग आली तेव्हा माझा मुलगा बेशुद्धावस्थेत होता. मी त्याच्यावर प्रथमोपचार करत त्याला उठविण्याचा प्रयत्न केला पण याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर मी अँम्बुलन्सला बोलाविले आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले.
> रूग्णालयात डॉक्टरांनी देखील मुलाल उठविण्याचा प्रयत्न केला पण मुलाने डोळे उघडले नाही. काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टर्सलाही समजू शकले नाही मुलाच्या मृत्यूचे कारण
> हेडलीच्या मृत्यूपूर्वी शेवटच्या तासांत त्याच्यासोबत नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी विंचेस्टर कोरोनर कोर्टात खटला देखील सुरु होता. कोर्टाने सांगितले की, घटेनेच्या दिवशी महिला आपल्या मुलाल दूध पाजण्यासाठी घेऊन गेली तेव्हा तो तिच्या मागच्या बाजूला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती झोपेतून उठली तेव्हा मुलगा समोर आढळून आला.
> डॉक्टर्सही मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधू शकले नाही. तर दूसरीकडे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने साउथेम्पटन जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाच्या मृत्यूबाबत विचारपूस केली असता मुलाच्या आईच्या विरोधात जाता येईत अशी तेथेही कोणतीच माहिती त्याला मिळाली नाही.
> यानंतर कोर्टाने आपला निर्णय ऐकवत, त्या महिलेसंबंधी सहानुभूति दाखविली. कोर्टाने या महिलेला कोणत्याही प्रकारे दोषी ठरविले नाही.
> पीडित महिला सध्या लहान मुलांसोबत झोपतांना होणाऱ्या धोक्यांविषयी आपल्या सारख्या इतर मातांना सावध करत आहे. जेणेकरून आणखी कोणत्या मुलाचा मृत्यू होऊ नये. पण अद्यापही मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.