आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने माजी प्रियकराला जिवंतच भिंतीत गाडले, 6 वर्षांनंतर झाला खुलासा; कारण ऐकून पोलिसही हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - इटलीत 2013 मध्ये बेपत्ता झालेल्या 41 वर्षीय व्यक्तीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील पोलिसांनी एका भिंतीमधून त्याच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले आहेत. 6 वर्षांपासून बेपत्ता राहिलेल्या अल्बेनियन नागरिक लामज अॅस्ट्रिडचा खून तिच्याच माजी प्रेयसीने केला. पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपी प्रेयसीसह खून करण्यात तिची मदत करणाऱ्या 4 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, याच वर्षी जानेवारी महिन्यात एका बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या दरम्यान भिंत तोडली असताना एक डेड बॉडी सापडली. भिंत आणि पिलरला चिटकलेल्या कपड्यांसह फॉरेन्सिक चाचणी केली, तेव्हा तो मृतदेह लामज अॅस्ट्रिडचा होता असे स्पष्ट झाले. लामज वयाच्या साठीत असलेल्या एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 6 वर्षांपूर्वी त्याचे महिलेशी भांडण झाले आणि तो तिला सोडून गेला. याच गोष्टीचा त्या महिलेला इतका राग आला की तिने अट्टल गुन्हेगारांच्या गँगला त्याची सुपारी दिली. यासाठी 4 गुन्हेगार नेमण्यात आले होते. 2013 मध्ये त्यांनी सुरुवातीला लामजला मारहाण केली. यानंतर त्याला जिवंतच एका भिंतीमध्ये पुरले. 6 वर्षांपासून पोलिस लामजचा शोध घेत होते. आरोपी महिलेला जिनेव्हा विमानतळावरून तर तिच्या सहकाऱ्यांना सिसिली येथून अटक करण्यात आली.


इटलीत गुन्हेगारी टोळ्यांकडून शत्रूंमध्ये दहशत पसरवण्यासाठी एकमेकांच्या सदस्यांना सिमेंटच्या भिंतींमध्ये जिवंतच पुरले जाते. अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या मर्डरमध्ये मृतदेह सापडत नाही. परिणामी पोलिस बहुतांश खुनाच्या प्रकरणांचा तपास बंद केला जातो. युनिव्हर्सिटी ऑफ पालेरमोमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक सॅल्वातोर लूपो यांनी सांगितल्याप्रमाणे, शत्रूंमध्ये दहशत पसरवण्यासाठीच असे खून केले जातात. अनेकवेळा कुणी पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा त्यांच्या तोंडात खडे कोंबून मारले जाते. एखाद्याने गँगचे पैसे बुडवल्यास किंवा लोभ दाखवल्यास त्याला ठार मारून गुप्तांगावर एक नोट चिटकवला जातो. इटलीत अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. परंतु, यातील खूप कमी लोकांवर कारवाई करण्यात यश मिळाले.

बातम्या आणखी आहेत...