मुंबई / विभक्त राहणाऱ्या पतीकडून मला दुसरे अपत्य हवे! मुंबईतील महिलेची कोर्टात याचिका

नकार दिल्यास पतीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल -  कोर्ट 
 

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 04:31:00 PM IST

मुंबई - मुंबईतील एका न्यायालयातील प्रकरणामुळे सर्वजण चकित झाले आहेत. येथे घटस्फोटाचा खटला लढवत असलेल्या 35 वर्षीय महिलेने वेगळ्या राहत असलेल्या पतीपासून दुसरे मुल व्हावे यासाठी महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पतीने 2017 मध्ये पत्नीच्या कथित क्रुरतेला कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे.


पतीने दर्शवला विरोध
महिलेचे म्हणणे आहे की, तिची आई होण्याचे वय संपण्यापूर्वी ती वेगळ्या राहत पतीसोबत वैवाहिक संबंध ठेवून किंवा इनविट्रो फर्टिलायजेशनद्वारे गर्भ धारणा करण्याची परवानगी मागत आहे. दरम्यान न्यायालयाने आदेश देत खासगी स्वायत्तता आणि प्रजननक्षम आरोग्यावर आंतरराष्ट्रीय कायदा आणि कराराचा दाखला देत पत्नीच्या प्रजनन अधिकाराला मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. कोर्टाने याबाबत मॅरेज काउंसलरकडून सल्ला घेणे आणि एका महिन्याच्या आत आयव्हीएफ तज्ज्ञाची भेट घेण्याचे जोडप्याला निर्देश दिले आहेत. ही याचिका बेकायदेशीर आणि समाज व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे सांगत महिलेच्या पतीने यासाठी विरोध केला आहे.


पतीने नकार दिल्यास होऊ शकते कायदेशीर कारवाई
असे असले तरीही महिलेने आपल्या पतीकडे स्पर्म डोनेट (दान) करण्याचा आग्रह केला आहे. दरम्यान तांत्रिकदृष्ट्या मूल जन्मास घालणे कोणत्याही कायदा, लिखित किंवा अलिखित सामाजिक मानकाचे उल्लंघन नसल्याचे नांदेड कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोर्टाने दोघांना सहायक प्रजनन तंत्रज्ञान तज्ज्ञाकडे (एटीआर) जाण्याचे निर्देश दिले आहेत. पतीच्या आक्षेप घेण्यावर कोर्टाने सांगितले की, कोणत्याही वाजवी कारणाशिवाय तो यासाठी नकार देऊ शकत नाही. असे केल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.


पती-पत्नी दोघेही नोकरी करत असून त्यांना अगोदरपासून एक मुलगा आहे. मुंबईत राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीच्या कथित क्रुरतेमुळे 2017 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता.

X