आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाम्पत्याने मुलीला खोलीत झोपवले, काही तासांनंतर कॅमेरा पाहताच त्यांना बसला धक्का; खोलीत जाऊन पाहिले असता तोपर्यंत सर्व काही झाले उद्ध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉरफोक -  इंग्लंडमध्ये एक महिला आपल्या 18 महिन्याच्या मुलीला गमावल्यानंतर आता इतर पालकांना सावध करत आहे. महिला आणि तिचा पती मुलीला खोलीत झोपवून आले होते. दुपारच्या वेळी त्यांनी कॅमेरा पाहिल्यानंतर काही गडबड असल्याचे त्यांना जाणवले असता ते लगेच खोलीत गेले. तेथे मुलगी बेबी मॉनिटरच्या वायरमध्ये अडकलेली आढळून आली. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. महिलेचे म्हणणे आहे की, मुलीच्या सुरक्षेसाठी आणलेली वस्तूच तिच्या मृत्यूचे कारण बनली आहे. 

 

या अवस्थेत आढळली मुलगी. 

> सदर घटना गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये नॉरफोकच्या डेरेहम येथे घडली होती. याबाब तपास सुरु आहे. मंगळवारी मुलीच्या आई-वडिलांसोबत झालेल्या चौकशी दरम्यान विविध माहिती समोर आली आहे. 


> मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेनेल दुग्गान आणि तिचे पती जॅक्सनने त्यांची मुलगी जेसिका लॅसीसाठी तिच्या खोलीत लावलेल्या बेबी मॉनिटरमुळे ही घटना घडली होती. 
 
> दाम्पत्याने सांगितले की, दीड वर्षापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. पण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी ते मुलीला तिच्या खोलीत झोपवून आले तेव्हा एक विचित्र घटना घडली. 

> काही वेळानंतर जॅसनची नजर कॅमेरावर पडली असता त्याची दिशा बदलेली होती. ती तत्काळ मुलीच्या खोलीत गेले असता तेथील अवस्था पाहून त्यांनी धक्का बसला. 

> जेसिकाने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेला बेबी मॉनिटरचे वायर पकडले होते आणि ती त्यामध्ये अडकलेली आढळली. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 

 

हे कसे झाले अजूनही समजले नाही

> या प्रकरणाबाबत पालकांच्या चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले की, बेबी मॉनिटर बेडरूममध्ये एका शेल्फवर लावला होता. जेसिकाचा हाथ तिथपर्यंत पोहचू शकत नव्हता. इतकेच नाही तर त्यांनी वायर देखील भिंतीला फीट केले होते. जेणेकरून ते कोणाच्या हाताला येऊ येता कामा नये. 

> ती गेल्या दीड वर्षांपासून या खोलीत झोपत होती. पण यापूर्वी कधीच असे काही घडले नव्हते. घटनेच्या इतक्या दिवसांनंतरही हे कसे झाले याबाबत त्यांना काहीच कळत नाहीये. 

> आता दाम्पत्य इतर पालकांना मुलांच्या रुममध्ये बेबी मॉनिटर लावण्याबाबत सावध करत आहेत. जेणेकरून इतर कोणी त्यांच्या मुलीसारखे शिकार होऊ नये.

> जेसिकाची आई म्हणते की, मुलीच्या सुरक्षेसाठी आणलेली वस्तूच तिच्या मृत्यूचे कारण बनली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...