आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने घरात लावला सीक्रेट कॅमेरा, जेव्हा फुटेजमध्ये डॉगीसोबत भावी पतीला पाहिले तेव्हा बसला धक्का, मग घेतला हा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ डी जानेरिओ - ब्राझीलमध्ये एका महिलेला आपल्या दोन्ही हेल्दी पेट्सच्या बॉडीवर विचित्र डाग दिसून आले. ती त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली, परंतु दुखापत आणि डागांमागचे कारण लक्षात आले नाही. मग महिलेने एका मित्राच्या सल्ल्याने घरात गुप्त कॅमेरा इन्स्टॉल केला. तिने एका दिवशी कॅमेऱ्यातील फुटेज पाहिले तेव्हा भावी पतीचे क्रौर्य तिला दिसून आले. ही दुखापतीच्या खुणा भावी पतीने श्वानांना मारल्यामुळे झाल्या होत्या. यानंतर महिलेने आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आणि एका झटक्यात आपले लग्न मोडले.

 

कॅमेऱ्यातून समोर आले भावी पतीचे खरे रूप 
- ही घटना रियो डी जेनेरियोची आहे. नीनाला वाटत होते की, तिचा होणारा लाइफ पार्टनर तिच्यासोबतच तिच्या दोन्ही डॉगीजवरही खूप प्रेम करतो. पण ती चूक होती. 
- तिने एका दिवशी आपल्या दोन्ही श्वानांच्या शरीरावर जखमा झालेल्या पाहिल्या. ती त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेली, परंतु या जखमांमागचे खरे कारण काही लक्षात येत नव्हते.
- एका दिवशी तिने मित्राच्या सल्ल्यावरून घरात गुप्त कॅमेरे लावले. जेव्हा तिने त्याची फुटेज चेक केली तेव्हा ती आपल्या वाग्दत्त वराचे खरे रूप पाहून हैराण झाली.
- नीनाचा भावी पती जेव्हा कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी घरी आला तेव्हा तो विनाकारण दोन्ही श्वानांना मारू लागला. एवढेच नाही, त्याने दोन्ही श्वानांना जमिनीवरही उचलून पटकले.
- नीनाला हे पाहून खूप मोठा धक्का बसला. कारण तिला याची बिलकूल अपेक्षा नव्हती. ती आपल्या वाग्दत्त वराच्या वर्तणुकीमुळे निराश झाली होती.
- यानंतर नीनाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आणि आपल्या वाग्दत्त वराशी होणारे लग्न मोडले. तिने एक झटक्यातच लग्न कॅन्सल केले.

 

फेसबुकवर टाकला व्हिडिओ
- नीनाने आपल्या वाग्दत्त वराला श्वानांना टॉर्चर करण्याचा व्हिडिओही फेसबुकवर अपलोड केला, जेणेकरून त्याचे खरे रूप सर्वांसमोर यावे.
- तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ज्या व्यक्तीचे मी माझ्या घरात पूर्ण प्रेमाने स्वागत केले, तोच असे अत्याचार करत होता. त्याने या मुक्या जिवांवर जे काही केले, ते मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...