आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती होण्यासाठी केले बऱ्याचवेळा प्रयत्न, पण नाही मिळाले यश; डॉक्टरांकडे गेली असता समोर आले धक्कादायक कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमरसेट - इंग्लंडच्या सॉमरसेट भागातील 32 वर्षीय महिला बऱ्याच काळापासून स्वत:ला गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करीत होती. क्रिस्टल अॅशवुड नावाच्या या सिंगल महिलेने प्रथम फेसबुकद्वारे स्पर्म डोनरचा शोध घेतला आणि त्यांच्याकडून स्पर्म विकत घेऊन अनैसर्गिकपणे गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला. तीन प्रयत्नांनंतर ती डॉक्टरकडे गेली तेव्हा अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली.

 

> क्रिस्टलने सोशल मीडियावर तिचा दुःखद गोष्ट शेअर केली आहे, जेणेकरून ती अंब्रीओ तंत्राच्या मदतीने आई होण्यासाठी पैसे गोळा करू शकेल. क्रिस्टलने लिहिले की, "डॉक्टरांनी सांगितले की मी कधीच आई बनू शकणार नाही कारण 25 वर्षांची असतांनीच माझे पीरियड्स बंद झाले होते. ज्याला मी पीरियड्स समजत होते ते काही वेगळच होत".

 

> क्रिस्टलने सांगितले की 25 वर्षांच्या वयात तिला पीरियड्सची समस्या येत होती. कित्येक महिने पीरियड्स आलेच नाहीत. एकदा तिला सहा महिन्यांपासून पीरियड्स आले नव्हते. तणावमुळे पीरियड्स येत नसल्याचे तिला वाटायचे. वेळ निघून गेली परंतु तिने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. 


दुर्मिळ रोग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

> क्रिस्टलच्या गर्भाशयातील अंड्यांची संख्या वेगाने कमी होत गेली आणि कालांतराने अंडी नष्ट झाल्याचे डॉक्टरांना तपासणीमध्ये निदर्शनास आले. याला ओव्हरी फेलियर म्हणतात. डॉक्टरांच्या मते, ओव्हरी फेलियर हा जगातील एक अत्यंत दुर्मिळ रोग आहे. यामुळे, आता क्रिस्टल सोशल मीडियावर इतर स्त्रियांना सावध करण्याबरोबरच पैसे गोळा करत आहे. जेणेकरून ती स्पर्म डोनर शोधू शकेल आणि तिचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...