Home | International | Other Country | Woman Who Earns Millions By Cuddling and Giving Hug To Strangers

प्रति मिनिटाच्‍या हिशोबाने फिस चार्ज करते ही महिला, तिच्‍या या कामाबद्दल पतीचीही नाही कोणतीच तक्रार

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 08:55 PM IST

ऑस्‍ट्रेलियातील एक महिला लोकांना गळे भेटून लाखो रूपयांची कमाई करत आहे. एवढेच नव्‍हेतर यासाठी ती प्रतिमिनिटाच्‍या हिशोबान

 • ऑस्‍ट्रेलिया- ऑस्‍ट्रेलियातील एक महिला लोकांना गळे भेटून लाखो रूपयांची कमाई करत आहे. एवढेच नव्‍हेतर यासाठी ती प्रतिमिनिटाच्‍या हिशोबाने पैसे चार्ज करते. हैरान करणारी गोष्‍ट म्‍हणजे यावर तिच्‍या पतीचीही कोणतीच हरकत नाही. जैसिका ओ नील असे महिलेचे नाव आहे. आपल्‍या या अनोख्‍या व्‍यवसायाद्वारे मागील वर्षी तिने जवळपास 50 लाख रूपये कमावले होते.

  1 तास गळे भेटण्‍याची घेते एवढी फिस
  35 वर्षीय जेसिकाने यापूर्वी करिअर काऊसलर म्‍हणून काम केले आहे. नंतर ती मसाज थेरेपिस्‍ट बनली. यामध्‍येच तिने गळा भेटीचाही समावेश केला. यासाठी ती प्रतितास 46 पाऊंड (जवळपास 6 हजार रुपये) चार्ज करते. वर्षभरात ती जवळपास 50 लाख रूपये कमावते. अशा पद्धतीने आपण लोकांची मदतच करतो, असे जेसिकाचे म्‍हणणे आहे. एकटेपणा आणि डिप्रेशनमुळे त्रस्‍त असणारे लोकही जेसिकाजवळ यासाठी जातात. थेरेपीनंतर आपल्‍याला चांगले वाटत असल्‍याचे या लोकांचे म्‍हणणे आहे.


  आईमुळे सुचली आईडिया
  - जेसिकाने सांगितले की, तिला या अनोख्‍या थेरेपीची आयडिया आपल्‍या आईपासून मिळाली. जेसिकाने सांगितले की, जेव्‍हा एखाद्या गोष्‍टीमुळे मी खुप त्रस्‍त किंवा निराश व्‍हायची, तेव्‍हा आई मला घट्ट मिठी मारायची. यानंतर सर्व काही ठिक होऊन जायचे. आज जे लोक माझी गळाभेट घेऊन घरी जातात ते लोक आनंदी असतात.


  अशी आहे थेरेपी
  जेसिकाने सांगितले की, तिच्‍या मसाज पार्लरमध्‍ये येणारे बहुतांश पुरूष हे 35 वर्षाच्‍या पुढचे असतात. बहुतेकांना पाहूनच कळते की ते कोणत्‍या तरी गोष्‍टीमुळे परेशान आहेत. अशात थेरेपी त्‍यांच्‍या कामी येते. जेसिका हेही स्‍पष्‍ट करते की, ही थेरेपी फक्‍त आणि फक्‍त गळेभेटण्‍यापूरतीच मर्यादित आहे. जेसिका याला कॅफिन कडलिंग थेरेपी म्‍हणते. यामध्‍ये ती कस्‍टमर्ससोबत मित्र म्‍हणून वागते. त्‍यांच्‍यासोबत कॉफी पिते आणि त्‍यांना गळे भेटते व त्‍यांच्‍या फिलिंग्‍स आणि इमोशन समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करते.


  महिलाही घेतात लाभ
  जेसिकाने सांगितले की, येथे केवळ पुरूषच नव्‍हे तर एकाकी वाटणा-या महिलाही येतात. थेरेपीचा लाभ घेत त्‍या आनंदी होऊन परतात.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, या महिलेचा फोटो...

 • Woman Who Earns Millions By Cuddling and Giving Hug To Strangers
 • Woman Who Earns Millions By Cuddling and Giving Hug To Strangers
 • Woman Who Earns Millions By Cuddling and Giving Hug To Strangers
 • Woman Who Earns Millions By Cuddling and Giving Hug To Strangers

Trending