आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाला सासूकडून मारहाण, म्हणाली- घरी गेल्यावर सासूने केली मारहाण 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- केरळच्या सबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोनपैकी कनकदुर्गा नावाच्या एका महिलेने तिच्या सासूवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कनकदुर्गासह तिच्या वृद्ध सासूला रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

भगवान अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ४४ वर्षीय कनकदुर्गाने बिंदू अम्मीनी या महिलेसोबत गत २ जानेवारीला पहिल्यांदाच मंदिरात प्रवेश करत दर्शन घेऊन इतिहास रचला होता. त्यापूर्वी १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश निषिद्ध होता. मंदिर प्रवेशानंतर कनकदुर्गा मंगळवारी सकाळी पेरिनथलमन्ना येथील स्वत:च्या घरी गेली. मात्र, मंदिर प्रवेशास विरोध असलेल्या तिच्या सासूने तिच्याशी वाद घातला. तसेच मोगरीसारख्या टणक वस्तूने तिच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात जखमी झाल्याने कनकदुर्गाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. 

कनकदुर्गा ही सरकारी कर्मचारी असून, बिंदू केरळच्या कन्नूर विद्यापीठात कायद्याची लेक्चरर आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी सप्टेंबरमध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना भगवान अय्यप्पा मंदिरात दिला न जाणारा प्रवेश घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत प्रवेशास मंजुरी दिली होती. 

 

न्यायमूर्ती मल्होत्रा रजेवर; २२ रोेजी सुनावणी अशक्य 
सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेशाच्या निर्णयासंदर्भातील पुनर्विचार याचिकांवर येत्या २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या वैद्यकीय रजेवर आहे. 

 

दोन्ही महिलांच्या मंदिर प्रवेशात सरकारचा छुपा अजेंडा नाही 
दोन महिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेश केल्याच्या प्रकरणात राज्य सरकार किंवा पोलिसांचा कोणताही छुपा अजेंडा नाही. मात्र, एक मुख्य राजकीय पक्ष व त्याचे समर्थक सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाचा हक्क नाकारून स्वत:चा राजकीय स्वार्थ साधत असल्याचे केरळ सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात सांगितले. 

 

दरम्यान, न्यायमूर्ती पी.आर.रामचंद्र मेनन व एन.अनिलकुमार यांच्या पीठाने गत ८ जानेवारीला याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंगळवारी सरकार व त्यांच्या संस्थांचा खुला अजेंडा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे, हा असला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेशास मंजुरी दिली आहे, असे पीठाने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...