Home | National | Other State | woman who had two miscarriages after beaten up by husband shares her story

पत्नीला करायचा इतकी अमानुष मारहाण की दोनदा झाला गर्भपात, एक दिवस दीराने पाय बांधून बूटाने मारले; अवैध संबंधांना विरोध करणेही झाला गुन्हा!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 04:12 PM IST

4 पीडित महिलांनी मांडली अत्याचारांची आपबिती

 • woman who had two miscarriages after beaten up by husband shares her story

  मोगा (पंजाब) - पंजाबच्या मोगा जिल्ह्यात 4 विवाहितांवर त्यांच्या पती आणि सासरवाडीकडून होणाऱ्या अमानुष यातनांच्या व्यथा समोर आल्या आहेत. यात कुणी आपल्या पतीला दारु पिण्यापासून रोखले, तर कुणी पतीला अवैध संबंधांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पतीला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न या महिलांसाठी एक गुन्हाच ठरला. यातील एकीला तर पतीने एवढी मारहाण केली की त्यातच तिचा दोन वेळा गर्भपात झाला. त्या सर्वांनी पोलिसांसमोर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीगत मांडली आहे.


  मारहाणीत दोनदा झाला गर्भपात
  मोगा जिल्ह्यात राहणारी लवलीत कौर गंभीर जखमी अवस्थेत येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन वर्षांपूर्वीच तिचा विवाह गुरमेलन सिंग याच्याशी झाला होता. पती आधीपासूनच दारुडा होता. नशेतच त्याने कित्येकवेळा आपल्या पत्नीवर अमानुष अत्याचार केला. अनेकदा तिच्यावर बळजबरी करून बलात्कारही केला. या दरम्यान ती दोन वेळा गर्भवती झाली. आणि दोन्ही वेळा पतीच्या मारहाणीत तिचा गर्भपात झाला. याच गुरुवारी पुन्हा तो घरात बसून नशा करत होता. पत्नीने विरोध केला तेव्हा पतीसह दीराने सुद्धा तिचे पाय बांधले आणि बुटांनी अमानुष मारहाण केली. ती बेशुद्ध पडली तेव्हा तिच्या माहेरी फोन करून आपल्या मुलीला घेऊन जा असे त्याने म्हटले. तिला वडील नाहीत. तर गरीब आई तिचा सांभाळ करू शकत नाही. त्याच गोष्टीचा गैरफायदा घेत तिच्या सासरच्या लोकांनी नेहमीच तिचा छळ केला.


  अवैध संबंधांना विरोध केल्याची मिळाली अशी शिक्षा
  याच जिल्ह्यात राहणारी आणखी एक महिला दीप हिने सांगितल्याप्रमाणे, 6 वर्षांपूर्वी तिचा विवाह येथील शेरुखान याच्याशी झाला होता. लग्नानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला. मात्र, पतीचे दुसऱ्या एका महिलेशी अवैध संबंध होते. पत्नीने वेळोवेळी त्याचा विरोध केला. समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, सासरच्या लोकांनी तिला मदत करणे सोडून उलट मारहाण सुरू केली. त्यात पती तिला नेहमीच फासावर लटकून आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायचा. नुकतेच तिच्या सासू आणि दीरांनी तिचे दोन्ही मूल हिसकावून घेतले. वाद झाला तेव्हा सर्वांनी मिळून तिला इतकी बेदम मारहाण केली की उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.


  सासूला शिवी देण्यापासून रोखले तेव्हा...
  कुसुमने सांगितले, की लग्नानंतर तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी दिला मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर मूल झाले नाही तेव्हा तिलाच दोष दिला. डिसेंबर 2018 मध्ये तिने मारहाणींतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच महिन्यात दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आला आणि कुसुम पुन्हा सासरवाडीत गेली. आता गुरुवारीच तिच्या सासूने विनाकारण तिला शिवीगाळ सुरू केली. विरोध केला तेव्हा सर्वांनी मिळून तिला अमानुष मारहाण केली.


  नशा करण्यापासून रोखले तेव्हा...
  याच जिल्ह्यात राहणारी आणखी एक महिला शमाने सांगितल्याप्रमाणे, वर्षभरापूर्वीच तिचा विवाह मंगत रामसोबत झाला होता. परंतु, अमली पदार्थांचा व्यसनी आणि दारुडा असल्याने तो क्षुल्लक कारणांवरून तिच्यावर अत्याचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्याची आईच त्याला अमली पदार्थांच्या गोळ्या द्यायची. यातून मूल जन्माला येईल असे ती म्हणायची. दोन दिवसांपूर्वीच या गोष्टीवरून वाद झाला आणि सर्वांनी मिळून तिला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांत तक्रार सुद्धा दिली परंतु, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. ती सध्या जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे.

Trending