आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने सापडलेली लाखों डॉलरने भरलेली बॅग केली परत, प्रामाणिकपणामुळे मिळाले एवढे मोठे बक्षीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगस्टन(जमैका)- येथील एका गरीब महिलेला सेंट्रल पोलिस स्टेशनच्या एका एटीएममध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडली. या महिलेचे नाव एकैशा ग्रीन असून ती किंगस्टनमध्ये राहते. जेव्हा ती पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेली तर तीला 500 आणि 1000 डॉलरच्या नोटांनी भरलेली बॅग तिथे दिसली. एवढे पैसे बघून तिला मोठा धक्काच बसला.


ग्रीनने तिथे बसून खूप वेळ वाट पाहिली की, ज्याची बॅग असेल तो येईल पण कोणीही आले नाही. ऐवढे पैसे बघून थोड्या वेळासाठी तिच्याही मनात लालूच आली. तिला वाटले की, माझ्याकडे नोकरी नाही आणि आईलाही 200 डॉलरची गरज आहे. या पैशांनी तिची आयुष्यभराची गरीबी दुर होऊ शकते. पण तिने हे सर्व पैशे प्रामाणिकपणाने पोलिसांच्या स्वाधीन केले.


बॅग पोलिस स्टेशनमध्ये जमा केली
ही घटना मंगळवारी घडली होती. एकॅशाने ती बॅग पोलिस ठाण्यात जमा केली. त्यानंतर पोलिसांनी बॅग मालकाकडे पाठवली. ते पैसे एका कॉर्पोरेट कंपनीचे होते. यानंतर ग्रीनच्या प्रामाणिकपणाची सर्व ठिकाणी जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टरसमवेत अनेक अधिकारी ग्रीनला भेटायला आले आणि बक्षीस म्हणून तिला तब्बल 12 लाख डॉलर दिले.


कंपनीचे यापुढेही मदत करण्याचे आश्वासन
कंपनीने सांगितले की, आम्ही ग्रीनला यापुढेही मदत करणार आहोत. यासोबतच आपले मुलं कशा प्रकारे शिक्षण घेतात याकडेही आमचे लक्ष राहील. यादरम्यान त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्यांची सहकारी कंपनीने वर्षभर ग्रीनच्या मुलांना मोफत दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीनला मिळालेल्या या सन्मानामुळे ती खूप आनंदी आहे. याव्यतिरिक्त, इतर अनेक संस्थांनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत तिला भेटवस्तू दिल्या जात आहे.