आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपावर महिलेने केला असा कारनामा, व्हायरल झाला Video; पोट धरून हसत आहेत लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सुरुवातीला ती नेमके काय करत आहे हे कळत नसल्याने लोक दुर्लक्ष करतात. मग, कारण समोर येताच पोट धरून हसू येईल असा तिचा कारनामा आहे. ही महिला एका पेट्रोल पंपावर आपली जी कार घेऊन पोहोचली ती इलेक्ट्रिक होती. इलेक्ट्रिक कारमध्ये ती पेट्रोल भरण्यासाठी आली होती. तिने पेट्रोलचा पाइप हातात घेऊन टँक शोधण्याचा प्रयत्नही केला. परंतु, टँकचे झाकण कुठेही सापडत नसल्याने ती गोंधळली. इंधनचे भरण्यासाठी कॅप साडत नसल्याने तिने नोझल गाडीच्या चार्जिंक पॉइंटवर लावला. तरीही तिला काहीच कळत नव्हते.

 

ज्यांनी हा व्हिडिओ बनवला त्यांच्या मोठ-मोठ्याने हसण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. काही वेळानंतर एक व्यक्ती तिच्याकडे गेला आणि तिला समजावून सांगितले. मॅडम, ही कार एक इलेक्ट्रिक कार आहे. त्यामध्ये पेट्रोल, डीझेल किंवा गॅस भरता येणार नाही. यानंतर ती आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. 16 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर पोस्ट केला. युट्यूबवर हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...