आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यूरिख - पैसा असल्यास काहीही करता येते याची प्रचिती सित्झरलंडमध्ये राहणाऱ्या 24 वर्षांच्या सेलिन सेन्टिनोला पाहून येते. एकेकाळी शाळेत असताना सेलिनला लोक कुरूप म्हणून तिची थट्टा मस्करी करत होते. तिला इतकी हीन वागणूक मिळायची की कुणीच तिच्यासोबत मैत्री करण्यास तयार नव्हते. हे सर्वच काही केवळ लुक्स चांगले नसल्याने सहन करावे लागते ही गोष्ट तिच्या लक्षात आली. 6 वर्षांनंतर ती इंस्टाग्रामवर आली तेव्हा फॅन्सच्या रांगा लागल्या. दिवसेंदिंवस वाढत्या फॉलोअर्समध्ये त्यांचाही समावेश आहे, ज्यांनी एकेकाळी तिला जवळपास उभे देखील केले नव्हते. परंतु, जेव्हा त्यांना ही मुलगी तीच असल्याचे कळाले तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
तीनदा करावी लागली ब्रेस्ट सर्जरी
- टीनेजर असताना कुरूप म्हटली जाणारी सेलिन हिने आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. लाखोंची उधळपट्टी करून तिने तीने आपल्या ब्रेस्टची प्लास्टिक सर्जरी केली. तसेच स्तनांचे आकार 34A पासून 34FF करून घेतले आहे.
- इंस्टाग्राम स्टार सेलिनने सांगितल्याप्रमाणे, एकेकाळी लोक तिचे तोंड पाहताच अपशब्द बोलायचे. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. ती एका ब्युटी शॉपमध्ये हेअर ड्रेसरची जॉब करत होती. त्याच ठिकाणी पैसे कमवून तिने बचत केली आणि तोच पैसा सर्जरीसाठी वापरला.
- सेलिन सांगते, की आज तिला आपल्या शरीर आणि त्वचेवर गर्व आहे. £38,000 पाउंड स्टर्लिंग अर्थात 35 लाख रुपयांत तिने गाल, ओठ, नाक, हनुवटी, आणि ब्रेस्टसह बम लिफ्ट सर्जरी केली आहे.
- सेलिनने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच तिचे फॅन्स दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांतच ती एक इंस्टाग्राम स्टार बनली. सध्या तिचे 54 हजार फॉलोअर्स आहेत. याच अकाउंटवर तिने आपली स्टोरी देखील शेअर केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.