आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असह्य वेदनेमुळे 200 हून अधिकवेळा अॅडमिट झाली हॉस्पिटलमध्ये, दोन वर्षांत 2 नोकरींवर सोडावे लागले पाणी; डॉक्टर्स पीरियड्सचा आजार समजून करत होते उपचार पण.........

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिंगटन -  इंग्लंडमध्ये एका मुलीला पीरियड्सने होणाऱ्या वेदनांमुळे 200 वेळेस इमरजन्सी वॉर्डमध्ये अॅडमिट व्हावे लागले. तिचे दोन ऑपरेशन झाले आणि यामुळे तिला दोन नोकरींवर पाणी सोडावे लागले. 11 व्या वर्षापासून तिला वेदना होत आहेत. पण सुरूवातीला डॉक्टरांनी पीरियड्सच्य काळात पेलविकवर आलेली सुज समजले होते. योग्य तो उपचार घेतल्यावर वेदनेतून सुटका होते. पण तसे झाले नाही. अखेर डॉक्टर दोन वर्षांपूर्वीच या वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचले आणि एन्डोमेट्रीओसिस या आजाराबद्दल त्यांनी समजले. शस्त्रक्रियेनंतर ठीक होईल सांगितले होते. पण तीन महिन्यांनंतर तिला परत त्रास होण्यास सुरूवात झाली. 

 

शेकडो वेळा मारल्या डॉक्टरांकडे चकरा
> ब्रिंगटन येथे राहणारी 20 वर्षीय सिनेड स्मिथने सांगितले की, पीरियड्सच्या काळात तिला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे ती तासनतास पलंगावरच झोपून राहत असे. 

> स्मिथच्या मते, 2015 आणि 2016 मध्ये या वेदनेमुळे तिला अनेक वेळा रिसेप्शनिस्टची नोकरी सोडवी लागली. वाढणाऱ्या या वेदनेमुळे कर्मचाऱ्यांचा तिच्यावर विश्वास राहिला नव्हता.
 > तिने सांगितले की, कर्मचाऱ्यांना तिच्यावर विश्वास नव्हता. कारण तिच्याकडे पाहिले असात त्यांना तिची प्रकृती ठणठणीत दिसत होती. ती खोट बोलत आहे असे त्यांना वाटत होते.  

> स्मिथने सांगितले की, मी चुकीची नसताना ते मला चुकीचे समजत होते. एका वर्षांत शेकडो वेळा मी डॉक्टर्स आणि इमरजन्सी वॉर्डमध्ये दाखल होत होते. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 


शस्त्रक्रियेनंतरही थांबल्या नाहीत वेदना
> त्यानंतर स्मिथने नेमके कारण जाणून घेण्यासाठी सेक्शुअल हेल्थ क्लिनीकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला तपासणीनंतर पेल्विक इन्फ्लेमेशन आजार असल्याचे माहित झाले. पण औषधोपचारानंतरही काहीच फायदा झाला नाही.  

> त्यानंतर जानेवारी 2016 मध्ये डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना एन्डोमेट्रीओसिस बद्दल माहित झाले आणि त्याबद्दल गंभीरतेने घेतले. लेप्रोस्कोपीद्वारे त्यांनी स्मिथला होणाऱ्या वेदनेचे कारण शोधून काढले. 

> दरम्यान डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने एन्डोमेट्रीओसिसचा काही भाग काढण्याचा प्रयत्न केला. पण तिला माहित नव्हते की तो अक आजार आहे आणि तीन महिन्यांनंतर तिला परत त्रास होऊ लागला. 

> त्यानंतर स्मिथने या आजारबद्दल जनजागृती करण्यास सुरूवात केली. जेणेकरून इतर लोक याला समजू शकतील.


डॉक्टरांनी दिला विचित्र सल्ला

> स्मिथने सांगितले की, डॉक्टरांच्या मते, एन्डोमेट्रीओसिसचा उपचार शस्त्रक्रियेद्वारे यूट्रस काढल्यावरच होईल. पण स्मिथला ही शस्त्रक्रिया मान्य नाही. तिचे म्हणणे आहे की, भविष्यात तिला पण तिचा परिवार हवा आहे. त्यासाठी हे ऑपरेशन तिच्यासाठी योग्य नाहीये आणि बहुतेक कधीच तिच्यासाठी हे ऑपरेशन चांगले असणार नाही. 


काय आहे एन्डोमेट्रीओसिस?
> एन्डोमेट्रीओसिस ही एक खूपच वेदनादायक स्थिती असते. यामध्ये एंडोमेट्रिअल टिशू गर्भाशयाच्या बाहेर पसरतात. अंडाशय, फैलोपियन ट्यूब, पोट आणि ब्लॅडरच्या आसपास पसरतात. यामुळे पोटाच्या खालच्या भागात आणि कमरेच्या भागात खूपच त्रास होतो. याचा महिलांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो.

 

बातम्या आणखी आहेत...