Home | Khabrein Jara Hat Ke | Woman with vaginal condition is still virgin after five years of marriage, gives birth

Virgin Mother: लग्नाच्या 5 वर्षांनंतरही Virgin, विचित्र आजाराने ग्रस्त आहे ही महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 03:54 PM IST

तरीही आई होण्याचे स्वप्न असे झाले पूर्ण

 • Woman with vaginal condition is still virgin after five years of marriage, gives birth

  वॉशिंग्टन / अहमदनगर - येथे एका महिलेला इतका विचित्र आजार आहे की लग्नाच्या 5 वर्षांनंतरही ती कुमारीच आहे. डॉक्टरांनी तिच्या या कंडिशनला व्हजायनिझ्म असे म्हटले आहे. या परिस्थितीत शारीरिक संबंधच प्रस्थापित करता येत नाहीत. मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यापासून ते डॉक्टरांच्या उपचारापर्यंत सर्वच करून पाहिले. परंतु, तिची समस्या अद्याप दूर झाली नाही. तरीही डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया करून तिची आई होण्याची इच्छा आवश्य पूर्ण केली आहे. गेल्या महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला. आता तिने आपली ही संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे.


  संकोचमुळे सांगितली नाही आपली कंडिशन...
  अहमदनगरला राहणाऱ्या 30 वर्षीय रेवती बोरदावेकर हिला वयाच्या 22 व्या वर्षी सर्वप्रथम आपल्या कंडिशनचा पत्ता लागला होता. आपण कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार नाही हे तिला कळाले होते. पंरतु, मेडिकल हेल्प घेणे तर दूरच संकोच आणि लाजेमुळे ही गोष्ट कुणालाही सांगूच शकली नाही. तसेच हा निर्णय भविष्यावर सोडून दिला. 2013 मध्ये ती ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून भावी पती चिन्मयच्या संपर्कात आली. त्यावेळी चिन्मय अमेरिकेत होता. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि लग्नाचा निर्णय घेतला. चिन्मय रेवतीशी लग्न करण्यासाठी भारतात आला आणि तिला अमेरिकेत घेऊन गेला. लग्नाच्या पहिल्याच रात्री रेवतीने चिन्मयला आपल्या मेडिकल कंडिशनबद्दल सांगितले.


  नेमका कोणता आजार?
  > रेवतीने आपल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी विविध प्रकारचे उपाय सूचविले. काहींनी सेक्सपूर्वी वाइन पिण्याचा सल्ला दिला. तर काहींनी योनीच्या आस-पास सॉफ्टनर, क्रीम लावण्याचे सल्ले दिले. परंतु, मित्रांचा एकही सल्ला कामी आला नाही. यानंतर रेवतीने डॉक्टरांची मदत घेतली. डॉक्टरांनी तिला जनरल एनेस्थिसिया देऊन चेक-अप केले. तेव्हा तिला व्हजायनिझ्म नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले.
  > व्हजायनिझ्म एक असा आजार आहे, ज्यात योनीच्या आस-पासच्या मांसपेशी संकुचित होतात. त्यामुळे, शारीरिक संबंध बनवता येत नाही. डॉक्टरांनी सर्जरी करून तिच्या योनीत असलेल्या मसल्सवर चिरा मारल्या आणि शस्त्रक्रिया करून थोडीशी जागा तयार केली. तरीही या उपचारानंतर तिला शारीरिक संबंध बनवता आले नाही.


  असे पूर्ण झाले आई होण्याचे स्वप्न
  सल्ले आणि उपचार अशा सर्वच पर्यायांचा अवलंब करूनही काहीच हाती लागले नाही. यानंतर कपलने किमान पालक तरी होऊ असा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या मदतीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात आयव्हीएफ उपचाराच्या माध्यमातून रेवतीला गर्भधारणा झाली. 48 तासांच्या प्रसव वेदनेनंतर तिने 9 फेब्रुवारी रोजी एका मुलीला नैसर्गिकरित्या जन्म दिला. पालक होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता रिलेशनशिपमध्ये काही अडचण येणार नाही असे रेवतीने सांगितले आहे.

 • Woman with vaginal condition is still virgin after five years of marriage, gives birth
 • Woman with vaginal condition is still virgin after five years of marriage, gives birth
 • Woman with vaginal condition is still virgin after five years of marriage, gives birth

Trending