आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह आजार : झोपेतून उठली तर शरिरावर होते जांभळे चट्टे, महिलेला कारन समजेना, डॉक्टरांकडे गेली तर समजले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रॉपशायर - ही कथा आहे इंग्लंडच्या एका महिलेची. तिच्यासाठी एक सकाळ अत्यंत वाईट बातमी घेऊन आली. ती झोपेतून उठली तेव्हा तिच्या शरिरावर जांभळे चट्टे होते. त्याचे कारण महिलेला समजत नव्हते. ती जखमीही झालेली नव्हती. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा तिला प्लेटलेट्स डिस्ऑर्डर असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर बोन मॅरो बायोप्सी झाली त्यानंतर तिला दुर्मिळ ल्युकेमिया असल्याचे समोर आले. संपूर्ण जगात या रोगाचे फार तर 100 रुग्ण असतील. 


धोकादायक रोगाशी सामना 
- श्रॉपशायरच्या राहणाऱ्या मेडिकल सेल्सपर्सन थिया विल्सन म्हणाल्या की, शरिरावर चट्टे पाहून त्यांना नेमके काय झाले ते कळत नव्हते. 
- डॉक्टरांना आधी प्लेटलेट्स डिसऑर्डर असेल असे वाटले. पण बायोप्सी नंतर ल्युकेमियाबाबात समजले. त्यात दुर्मिळ एक्यूट प्रोमिलोसाइटिक ल्यूकेमिया असल्याचे समजले आणि सर्वकाही संपले असे मला वाटले.
- आजार कळल्यानंतर 24 तासांच्या आत फर्स्ट राऊंड किमोथेरपीच्या फोर सायकलबाबत सांगत त्यांना त्यासाठी तयार राहाण्यास सांगण्यात आले. 
- थिया यांचे प्लेटलेट्स काउंटही फक्त 9 आहे. सामान्यपणे ते 140 से 400 असतात. काऊंट कमी झाल्याने इंटर्नल ब्लिडिंग धोकादायक पातळीवर पोहोचली होती. 
- थियाला लगेचच सेपरेट रूममध्ये अॅडमिट केले. त्यानंतर पाच महिने किमोथेरपी आणि एटीआरए सुरू होते. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ताजा फ्रोजन प्लाझ्मा दिला जात होता. 


उपचार कामी आले 
चांगली गोष्ट म्हणजे उपचाराचा सकारात्मक परिणाम झाला. 6 महिन्यात तिच्या तब्येतीत प्रगती दिसली. जीवनाच्या सर्यतीत थिया परतली होती. पण तरीही तिला अनेक टेस्ट्सचा सामना करायचा होता. या सर्वानंतर आता थिया श्रॉपशायर ब्लड फंड ट्रस्टसाठी निधी गोळा करण्याचे काम करते. 

बातम्या आणखी आहेत...