आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Womans Abortion Failed And She Gave Birth To Live Baby, That Died In Her Hands, Emotional Story

डॉक्टरने महिलेच्या गर्भनाळेतून दिले इंजेक्शन, पोटात तडफडू लागले बाळ, जोराने हातपाय झाडत झाला त्याचा जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'मेडिकल सायन्स' सिरीजवर आधारित आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी संबंधित अशा अनेक रिअल लाइफ शॉकिंग स्टोरीज आहेत, ज्या जाणून तुम्ही जागरूक व्हाल.)


ब्रिटन - ब्रिटनच्या लँकेशायरमध्ये एका महिलेने आपल्यासोबत घडलेली एका विचित्र घटनेबाबत सांगितले आहे. 35 वर्षीय सोफिया खानला प्रेग्नन्सीनंतर अबॉर्शन करावे लागते. डॉक्टर 100 % गॅरंटी देत म्हणतात की, सर्वकाही ठीक होईल. परंतु अबॉर्शननंतर जे काही झाले त्याने महिलेला आयुष्यभराचे दु:ख दिले. 

 

बाळाला होता जीवघेणा आजार...
- सोफियाने सोशल मीडियावर सांगितले की, तिने आपल्या बाळाचे अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक, सोफियाला डॉक्टरांनी सांगितले होते की, तिच्या बाळाला गर्भातच एक भयंकर आजार आहे. या आजाराचे नाव होते spina bifida. या आजारामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये चिरा पडून गंभीर समस्या होतात. ज्यामुळे बाळ जिवंत राहण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते. यामुळेच सोफिया आणि तिचा पती शकीलने मनावर दगड ठेवून निर्णय घेतला होता, परंतु डॉक्टरांच्या बेपर्वाईमुळे बाळाचा जन्म झाला आणि जाता-जाता आईचा आयुष्यभराचे दु:ख देऊन गेला.

 

बाळाला दिले होते इंजेक्शन
- अबॉर्शनसाठी डॉक्टरांनी आधी बाळाला गर्भनाळेतून एक इंजेक्शन दिले. जेणेकरून त्याचा श्वास आणि हृदयाची धडधड बंद व्हावी. मग अबॉर्शन सहजपणे करता येईल. परंतु येथेच गडबड झाली. सोफिया म्हणाली, ''इंजेक्शन दिल्यानंतर तो माझ्या पोटात तडफडत होता. तो जोराने हातपाय झाडत होता. मला हे कळून चुकले होते. पण कुणीच माझे ऐकायला तयार नव्हते. मी माझ्या पोटातच त्याला मरू देत होते.''

 

त्याला मला एकदा पाहायचे होते...

- भावुक सोफियाने म्हटले, ''त्याचा मृत्यू झाला नव्हता. लेबर पेननंतर मी प्रसूत झाले. तो रडत होता, तडफडत होता. त्याला माझ्या हातांवर ठेवण्यात आले. पुढच्या काही क्षणांतच त्याने दम तोडला. मला असे वाटले की, जाण्याआधी त्याला मला एकदा पाहायचे होते. कुणालाच कळणार नाही की, हा माझ्यासाठी केवढा मोठा धक्का आहे. मी हा क्षण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.''

 

24 आठवड्यांनंतर रेअर असतात अबॉर्शन
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफियाचा गर्भ 24 आठवड्यांचा झालेला होता. यानंतर अबॉर्शनसाठी स्पेशल केस आणि परमिशनची गरज असते. चिमुरड्याला गंभीर आजार वा अबनॉर्मल असल्यावरच याची परमिशन दिली जाते.

 

मृत बाळाला जन्म देते महिला

- एक्स्पर्ट्सच्या मते, हे अनोखे प्रकरण नाही. वास्तविक, जेव्हा 24 आठवड्यांच्या नंतर अबॉर्शन केले जाते, तेव्हा आईच्या पोटात एक सुई टाकून बाळाला इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनने त्याचा श्वास आणि हृदयाची धडधड बंद होऊन जाते. यानंतर महिला मृत बाळाची प्रसूती करते. सोफियाच्या बाबतीत बाळाचे श्वास सुरू होते आणि तिला याची दु:खद जाणीव होत होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या केसचे आणखी काही Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...