Home | Maharashtra | Marathwada | Nanded | Woman's betrayal by marriage bait; Accused Nigerian

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक; आरोपी नायजेरियन

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 07:25 AM IST

पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली.

 • Woman's betrayal by marriage bait; Accused Nigerian

  नांदेड - हल्ली संकेतस्थळावरून लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र या संकेतस्थळावरूनही फसवणूक होऊ शकते हे देगलूर येथील एका महिलेच्या अनुभवावरून उघडकीला आले. एका संकेतस्थळावरून एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


  मूळ नायजेरियाचा रहिवासी असलेला आणि सध्या दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या थियोफिलस मारो याचे एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून देगलूरच्या महिलेशी सूत जुळले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला अमेरिकेतून चांगल्या गिफ्ट पाठवतो असे सांगत तिच्याकडून ४ लाख ९० हजार २०० रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने १८ मे रोजी देगलूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  पोलिस निरीक्षक गजानन सैदाने यांंच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास चालू करण्यात आला. तपासादरम्यान संशयित आरोपी हा दिल्ली येथे असल्याचे समजताच फौजदार गजानन क्षीरसागर, बबरुवान लुंगारे आणि सुनील पत्रे यांनी दिल्ली गाठून आरोपीला बेड्या ठोकल्याा.

  दिल्लीत मुक्काम
  ४ दिवस दिल्ली येथे तळ ठोकून शिताफीने आरोपी थियोफिलस मारो पी. अभी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला मंगळवारी देगलूरला आणण्यात आले. या प्रकरणात अजून तीन आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे.

Trending