Home | Divya Marathi Special | woman's day special avani chaturvedi news in marathi

यशाचा उत्सव  : अवनी म्हणाली, विमान उडवण्यास मिळाले नसते तर नाेकरी साेडली असती

दिव्य मराठी | Update - Mar 08, 2019, 11:18 AM IST

भारतीय हवाई दलाची पहिली महिला फायटर प्लेन पायलट. फ्लाइंग लेफ्टनंट पदावर आहे.

 • woman's day special avani chaturvedi news in marathi

  मध्य प्रदेशातील रिवाच्या अवनी यांची आई सविता चतुर्वेदी
  अवनी हिला सामान्य मुलींप्रमाणे चित्रकला, पाककला, पेंटिंग यांची खूप आवड हाेती. पायलट बनायचे आहे, असे ती नेहमी सांगत हाेती. आपल्या समाजात काही जण मुलींना ‘बिचारी’ संबोधत कमकुवत करतात. यामुळे मी तिला नेहमी सांगत आले, तू आणि तुझा भाऊ यांच्यात काहीच फरक नाही. यामुळे आज दाेघेही लष्करात अधिकारी आहेत. अवनी बीटेक करण्यासाठी राजस्थानमध्ये जात हाेती तेव्हा आम्ही तिला साेडण्यास गेलाे. त्या वेळी तिला म्हणालाे, पुढचा मार्ग तुला एकटीलाच पूर्ण करायचा आहे. स्वत: आव्हानांना सामाेरे जायचे आहे. अभ्यासात हुशार असल्याने बीटेकमध्ये तिला ८८ टक्के मिळाले.


  अभियंता झाल्यावर आयबीएमची आॅफर आली. सहा महिने तेथे काम केल्यावर हवाई दलात निवड झाली. ती म्हणत हाेती, ‘आई, पायलट बनण्याची संधी मिळाली नाही आणि ग्राउंड स्टाफमध्येच मला ठेवले गेले तर हवाई दलातील नाेकरी साेडून देईन.’ मी नेहमी सांगते, मुलींनी वेगळी संधी देण्याची गरज नाही. त्या स्वत:च हवी ती संधी शाेधून घेतात.


  अवनी चतुर्वेदी
  भारतीय हवाई दलाची पहिली महिला फायटर प्लेन पायलट. फ्लाइंग लेफ्टनंट पदावर आहे.

Trending