Home | Divya Marathi Special | woman's day special gita gopinath news in marathi

आपापल्या क्षेत्रात देशातील पहिल्या महिलांची कथा आई-वडिलांकडून...

दिव्य मराठी | Update - Mar 08, 2019, 11:21 AM IST

गीताचे वडील म्हणाले, सर्व निर्णय मुलीने स्वत:च घेतले, माझेही एेकले नाही

 • woman's day special gita gopinath news in marathi

  चेन्नईहून गीताचे वडील टी. व्ही. गोपीनाथ
  मला आठवते, गीता सातवीत हाेती. तेव्हापासून गावातील शाळेत ती एकटीच जाऊ लागली. ताे तिचा निर्णय हाेता. या निर्णयामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तिचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. एकदा मला इंटर स्कूल अॅथलेटिक्स स्पर्धेबाबत माहिती मिळाली. गीताला मी त्यात सहभागी हाेण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘पापा मी नंबर वन बनू इच्छिते. परंतु स्पाेर्ट‌्समध्ये नंबर वन हाेईन, इतकी चांगली नाही.’ १२ वर्षांच्या मुलीची या विचारसरणीने मला आश्चर्य वाटले. हायस्कूल व हायर सेकंडरीत ती टाॅपला हाेती. काॅलेजमध्ये अनेक मुले तिचे मित्र हाेते.


  दिल्लीतील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिकत असताना एका क्लासमेटने तिला प्रपोज केले. गीताने अनेक वेळा त्याचा प्रस्ताव नाकारला. परंतु शेवटी त्याच्याशीच लग्न केले. प्रपाेजल नाकारणे व स्वीकारणे दाेन्ही तिचे निर्णय हाेते. कामासाठी ती समर्पित हाेती. मुलाच्या जन्माच्या एक दिवस आधी ती शिकागाेतील कार्यालयात हाेती. त्याच्या जन्मानंतर १४ व्या दिवशीच कार्यालयात गेली.


  गीता गोपीनाथ
  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मुख्य अर्थतज्ज्ञ झालेली दुसरी भारतीय व पहिली महिला.

Trending