Home | Divya Marathi Special | woman's day special news in Marathi

हे माहीत आहे का? 19 व्या शतकापूर्वी गुलाबी रंग मुलांचा हाेता, पहिल्या महायुद्धानंतर मुलींचा झाला

दिव्य मराठी | Update - Mar 08, 2019, 11:10 AM IST

१९व्या शतकापूर्वी गुलाबी रंग युद्ध आणि शौर्याचे प्रतीक हाेते. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात अधिकाऱ्यांचे हेल्मे

 • woman's day special news in Marathi

  १९ व्या शतकापूर्वी : २ हजार वर्षांपर्यंत गुलाबी रंग पुरुष शौर्याचे प्रतीक हाेते
  १९व्या शतकापूर्वी गुलाबी रंग युद्ध आणि शौर्याचे प्रतीक हाेते. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात अधिकाऱ्यांचे हेल्मेट व ड्रेस गुलाबी रंगाचे हाेते. १७९४ मध्ये आलेले पुस्तक ‘ए जर्नी राउंड माय रूम’ मध्ये लिहिले की, पुरुषांच्या खाेलीत गुलाबी रंगाचे पेंटिंग व वस्तू असायला हव्या. यामुळे उत्साह वाढताे.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, याविषयी आणखी रंजक माहिती...

 • woman's day special news in Marathi

  १९१८ : पिंक कॉलर जॉब महिलांचा असतो, पुरुष यापासून लांब राहू लागले
  पहिल्या महायुद्धाच्या वेळी परिचारिका, टायपिस्ट, सचिव अशा नाेकऱ्या वाढल्या. सुशिक्षितांचा हा व्हाइट कॉलर जॉब नव्हता किंवा श्रमिकांचा ब्लू कॉलर जाॅब नव्हता. याला पिंक कॉलर जॉब म्हटले गेले. यात प्रगतीची शक्यता मर्यादित हाेती. यामुळे हिला महिलांची नाेकरीच समजले जाऊ लागले.

 • woman's day special news in Marathi

  १९२७:पॅरिस ‘फॅशन शो’त महिलांसाठी गुलाबी रंगाच्या विचारावर झाली चर्चा  
  पॅरिस फॅशन शोमध्ये जेंडर कलर पेअरिंग शब्द चर्चेत आला. म्हणजेच पुरुष व महिलांना रंगाच्या आधारावर पाहा. १९२७ मध्ये टाइम मॅगझिनने गुलाबी रंग पुरुषांची आवड असल्याचे सांगितले. १९४० येईपर्यंत महिलांसाठी गुलाबी व पुरुषांसाठी निळ्या रंगाच्या ड्रेसचा ट्रेंड येऊ लागला.

 • woman's day special news in Marathi

  १९५० पासून : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची पत्नी गुलाबी ड्रेस फॅशन आयकॉन झाल्या
  या काळात हॉलीवूडचा काउबॉय चित्रपट आला. यामुळे मुलांमध्ये पांढरा टी-शर्ट व ब्लू जिन्सची फॅशन आली. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयजनहावर यांची पत्नी गुलाबी ड्रेसमध्ये दिसू लागल्या आणि हा ड्रेस ट्रेंडमध्ये आला. त्यानंतर मुलींसाठी रुमाल, कपडे असे खूप काही गुलाबी रंगात येऊ लागले.

 • woman's day special news in Marathi

  १९८५ : अल्ट्रासाउंडने मुलांचा लिंग समजू लागले, पिंक-ब्लू वॉर्डरोब ट्रेंडमध्ये आले 
  अल्ट्रासाउंड तंत्रज्ञान १९८५ मध्ये आले. जन्मापूर्वी मुलांचे लिंग समजू लागले. आई-वडील येणाऱ्या मुलांसाठी गुलाबी व निळ्या रंगावर खाेली, कपास सजवू लागले.  १९९७ मध्ये बॉर्बी डॉलसुद्धा गुलाबी रंगाची झाली. या पद्धतीने जन्मापासून मुलांच्या मनात गुलाबी रंगाचे  मनोविज्ञान तयार केले गेले.

Trending