Home | National | Other State | Woman's dead body found from catchment area, killed by brother in law due to illicit relations

दिराने रात्री ऐकला होता वहिनीचा प्लॅन, सकाळी 4.30 ला महिला घरातून निघताच केला तिचा पाठलाग, तळ्याजवळ पोहचताच संशय खरा ठरला...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 02:33 PM IST

ओळख लपवण्यासाठी दगडाने ठेचला चेहरा.

 • Woman's dead body found from catchment area, killed by brother in law due to illicit relations

  बिलासपूर(छत्तीसगढ)- अनैतिक संबंधामूळे दिराने आपल्याच वहिनीच्या डोक्यात रॉड आणि काठीने वार करून हत्त्या केल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला. महिलेचे नाव नेहा कश्यप आहे. पोलिसांनी आरोपी दिराला अटक केले आहे.


  महिलेने या युवकाला शेवटचा कॉल केला होता
  पोलिसांनी महिलेची कॉल डिटेल चेक केल्यावर संजय मरावी नावाच्या युवकाला शेवटचा कॉल केल्याचे समोर आले. पोलिसांनी संजयची कसून चौकशी केल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. महिलेचा पती जितेंद्र आणि संजय चांगले मित्र आहेत, आणि त्याचे नेहमी घरी येणे-जाणे होते. जिंतेंद्र भोळ होता त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीसोबत संबंध बनवले. या अनैतिक संबंधाची माहिती महिलेचा दीर राजेंद्रला कळाली होती. बुधवार सकाळी 4.30 ला महिला घराला कुलुप लावून तळ्याकाठी अंघोळ करायला जात आहे असे सांगून निघाली. पण ती तळ्याकाठी संजयला भेटायला जात आहे हे राजेंद्रला कळाले होते. त्याने रात्री त्या दोघांची फोनवर झालेले बोलणे ऐकले होते.


  महिलेच्या नवऱ्याचा मित्र होता संजय
  सकाळी महिला घरातून निघाल्यावर राजेंद्रने तिचा पाठलाग केला. संजय आधीच ठरलेल्या जागेवर पोहचला होता. त्याला पाहून राजेंद्रला राग अनावर झाला, आणि त्याने पाठीमागून महिलेवर रॉड आणि काठीने वार करायला सुरू केले. शिवाय ओळख लपवण्यासाठी त्याने महिलेचा चेहरा दगडाने ठेचून काढला. हे सगळं होत असताना संजयने तेथून पळ काढला. पोलिसांनी आरोपी राजेंद्र आणि संजय या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Trending