Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Woman's getting angry for water issue

महिला पाण्यासाठी आक्रमक, खा. दानवेंना बोलवा म्हणत आ. भुमरेंचे भाषण बंद पाडले

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:39 AM IST

प्रचार सभेत टाहो, लिंबगावात प्रचारसाठी आलेल्यांना महिलांनी घेतले फैलावर

  • Woman's getting angry for water issue

    पैठण- पैठण तालुक्यातील १२० गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरही वेळेवर येत नसल्याने महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. दरम्यान, पाणीटंचाईमुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी जात असलेल्या तालुक्यातील पुढाऱ्यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. लिंबगाव येथे आमदार भुमरेंसह भाजपचे डाॅ. सुनील शिंदे प्रचारासाठी आले असता तेथे महिलांनी हंडे घेऊन येत आम्हाला पाणी द्या किंवा खासदार दानवेंना गावात आणा तरच प्रचाराला या, असे म्हणत संतप्त महिलांनी आमदारांचे भाषण बंद पाडले. हा प्रकार सोमवारी रात्री घडला.


    आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणीटंचाईबद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदार भुमरे, डॉ.सुनील शिंदे यांचे भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी आपले भाषण आवरते घेऊन काढता पाय घेतला. तालुक्यातील पाणीटंचाई पाहता लोक आता शिवसेनेचे आमदार भुमरंेना साहेब खासदाराला गावात आणा व पाणीटंचाई दाखवा म्हणत असल्याने दानवेंची पंचायत होत असून स्थानिक भाजप व शिवसेनेच्या पुढाऱ्यांना दानवेंच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.


    महिला आक्रमक नेत्यांचे आश्वासन
    लिंबगाव येथे खा. दानवेंच्या प्रचार सभेत पाण्यासाठी महिला आक्रमक होत शिवसेना-भाजपच्या पदधिकाऱ्यांचे भाषण बंद पाडल्याने सभेतून पुढाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. मात्र डॉ.सुनील शिंदे यांनी महिलांना टँकर वाढवून देण्याच्या मागणीला मान्य करत लवकरच टँकर वाढवण्याचे आशवासन दिले. लिंबगावात २ टँकरने पाणी पुरवठा होतो. एक टँकर येथील एका पुढाऱ्याच्या वस्तीवर खाली होते. तर एक टँकर गावातील विहिरीत ओतलेले जाते. हे पाणी शेंदूर काढण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते.

Trending