आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virgin Police: People Says Here Womans Have To Pass Virginity Test To Get In Police Job, Police Told Different Story

OMG! पोलिसभरतीसाठी महिलांना द्यावी लागते व्हर्जिनिटी टेस्ट; पास होणाऱ्या महिलांनाच पोलिस होण्याचा अधिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- इंडोनेशियामध्ये महिलांना पोलिस भरतीसाठी व्हर्जिनिटी टेस्ट देणे बंधनकारक आहे. ही सक्ती मागील अनेक वर्षांपासून केली जाते. पोलिस भरतीवेळी महिलांना टू-फिंगर टेस्ट द्यावी लागते. इंडोनेशियाप्रमाणेच जगातील अनेक देशांच्या मानवाधिकार संघटनांनी या सक्तीला विरोध केला आहे. या प्रकरणी इंडोनेशिया पोलिसांनी या घटनेबाबत आपली बाजू मांडून सगळ्यांना गोंधळात टाकले आहे.

 

पोलिसांनी सांगितले महिलांची टेस्ट होते पण व्हर्जिनिटीची नाही...

> इंडोनेशिया पोलिसांनी सांगितले की, सुरवातीच्या काळात महिलांना पोलिसभरतीच्या वेळी व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागत होती. आम्ही या बाबीची काळजी घेतो की, पोलिस भरतीत येणाऱ्या महिला या सुंदर आणि तरुण असणे गरजेचे आहे. आम्ही महिलांच्या सौंदर्यासोबत त्यांचे फिटनेस बघतो. त्यासाठी डॉक्टरांची एक संपूर्ण टीम आमच्यासोबत असते.'

 

> इंडोनेशियन पोलिसांनी केलेल्या दाव्यामुळे  गोंधळ उडाला आहे. महिलांना पोलिस कर्मचारी होण्यासाठी सुंदर असणे का आवश्यक आहे? असे प्रश्न विचारले जात आहे.

 

आताही सुरू आहे व्हर्जिनिटी टेस्ट

> अनेक सामाजिक संघटनांनी सांगितले की, इंडोनेशियाचे पोलिसांची परंपरावादी विचारांचे  असल्यामुळे महिलांना आजही व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते. याशिवाय महिलांना अनेक मापदंडांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत सगळ्यात जास्त वादग्रस्त घटना समोर आली आहे ती म्हणजे महिलांच्या सर्व चाचण्या पुरुष अधिकाऱ्यांमार्फत होतात.

 

महिलांनी केला पोलिसांवर आरोप

> काही दिवसांपूर्वी एका महिलेने पोलिस भरतीवेळी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार नोंदवली आहे. महिलेने तक्रार केली आहे की, तिने सगळ्या टेस्ट दिल्यानंतरही ती व्हर्जिन नसल्यामुळे तिला पोलिसभरतीतून बाद करण्यात आले.

 

पुरुषांनासूद्धा द्याव्या लागतात अशाप्रकारच्या टेस्ट?

- इंडोनेशियातील माजी इंस्पेक्टर जनरल वासिस्टो यांनी सांगितले की, पुरुष आणि महिला या दोघांनाही मेडिकल टेस्ट द्याव्या लागतात. दोघांनाही सारख्याच प्रकारच्या टेस्ट पास कराव्या लागतात.

 

पोलिस भरतीमध्ये का बघितली जाते महिलांची सुंदरता?

> पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'महिलांच्या सुंदर असण्याने त्यांचे गुण समजतात. महिला मोठ्या प्रमाणात पोलिस जनसंपर्क अधिकारी होतात. त्यामूळे लोकांशी त्यांचा थेट संपर्क येतो. त्यामूळेच आम्हाला वाटते की पोलिसभरतीत येणाऱ्या महिलांनी सुंदर असावे.' सध्या इंडोनेशियामध्ये 4 लाख 61 हजार पोलिस कर्मचारी असून  फक्त 30 हजार महिला कर्मचारी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...