आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक फेल झाले होते महिलेच्या शरीराचे सर्वात महत्त्वाचे अंग, डॉक्टरांनाही कळाले नाही कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम. ब्रिटेनमध्ये राहणारी 32 वर्षांची एली लेसी गेल्या जानेवारीमध्ये भयंकर आजारी पडली होती. बेशुध्द अवस्थेत तिचे पती पॉल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रिपोर्टमध्ये समोर आले की, तिच्या शरीराचा सर्वात आवश्यक अंग म्हणजेच लिव्हर पुर्णपणे फेल झाले होते. लिव्हर फेल होण्याचे कोणतेही कारण डॉक्टरांना समजले नाही. एलीचे प्राण धोक्यात जाणार होते तेव्हाच एक चमत्कार झाला. 


- त्याच वेळी डॉक्टरांना त्या महिलेच्या ब्लड ग्रुपचा एक डोनर मिळाला. हा डोनर म्हणजे 60 वर्षांची वृध्द महिला होती, त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कुटूंबाच्या इच्छेनुसार महिलेले लिव्हर डोनेट करण्यात आले होते. 
- सुदैवाने एलीला योग्य वेळी त्या महिलेचे लिव्हर मिळाले, हे यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट करण्यात आले. एलीचे प्राण वाचले. 

 

पुन्हा धोक्यात गेला जीव 
- लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे एलीला जीवनदान मिळाले होते, पण डॉक्टरांनी तिला जड कामे करु नये असे सांगितले होते. पण ट्रान्सप्लांटच्या सात महिन्यांनंतर कळाले की, ती प्रेग्नेंट आहे. हे जाणून महिला चिंतेत होती. 
- डॉक्टरांनी तिला सांगितले होते की, ट्रान्सप्लांटमुळे ती प्रेग्नेंट राहणे तिच्यासाठी घातक होते. यामुळे तिचे प्राणही जाऊ शकत होते.

 

पण पुर्ण झाले आई होण्याचे स्वप्न 
- एलीला माहिती होते की, तिचा जीव धोक्यात आहे, पण तिला आई व्हायचे होते. एली म्हणाली, "मी लिव्हर ट्रान्सप्लांटची रिस्क घेतली तेव्हा माझा जीव धोक्यात होता. मग मी विचार केला की, अजून एक रिस्क घ्यायला काय हरकत आहे. कारण मला आई होण्याचा अद्भुत अनुभव घ्यायचा होता."
- सुदैवाने एलीने एका निरोगी बाळाला जन्म दिला आणि ती आता सुरक्षित आहे. एली म्हणाली, "मी ज्यावेळी बाळाला जन्म दिला, तेव्हा माझ्या मनात सर्वात पहिले मला लिव्हर देणा-या महिलेचा विचार आला. कारण तिच्यामुळे मी जिवंत होते. हे बाळ फक्त माझे नाही तर तिचाही अंश होता. तिने मला आणि माझ्या बाळाला जीवन दिले आहे."

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...