आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​समतानगरात महिलेचा घरात संशयास्पद मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - समतानगरातील धामणगाव वाड्यात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. पतीसह परिसरातील तरुणांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विवाहितेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 


अलका रवींद्र कांबळे असे मृत विवाहितेच नाव आहे. तिचा पती रवींद्र कांबळे हा नेहमीप्रमाणे सेंट्रिंग कामासाठी सकाळी घराबाहेर गेला होता. त्याचे वडील देखील कामावर गेले होते. रवींद्रची पत्नी अलका ही घरीच होती. दुपारपासून ती घरात झोपलेली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रवींद्र कामावरून घरी आला. त्याला पत्नी झोपलेली दिसली. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु ती झोपेतून उठत नसल्याने तो घाबरला. त्याने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील तरुणांनी धाव घेतली. रिक्षेतून अलकास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अाणले. डॉ.मिलिंद बारी यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. कांबळे कुटुंबीय परभणी जिल्ह्यातील असून कामानिमित्त जळगावात आले आहे. रवींद्रची आई गावाकडे गेली असल्याने त्याची पत्नी अलका ही दिवसभर एकटीच होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मृत्यूबाबत डॉक्टरांनी देखील संशय व्यक्त केला आहे. गुरुवारी शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होऊ शकेल. तत्पूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...