Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Wombless village Hajipura from Beed District in India

भारतातील तो जिल्हा, जिथे महिला मजुरी करण्यासाठी देतात आपल्या पोटच्या गोळ्याचा बळी, मासिक पाळीवर लागतो 500 रूपये प्रतिदिन दंड...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 03:34 PM IST

गर्भाशय असलेल्या महिलांना मजुरीवर ठेवले जात नाही, येथील बहुतेक महिलांना मुलबाळ नाहीये

 • Wombless village Hajipura from Beed District in India

  नवी दिल्ली- महाराष्ट्रातील दुष्काळ आपल्यासोबत अनेक गोष्टी घेऊन येतो. एकिकडे येथील शेतमजुरं दुष्काळामुले आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या महिलांना आपल्या पोटच्या गोळ्याचा बळी द्यावा लागत आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात हाजीपूर नावाच्या गावातील बहुतेक महिलांना मुलंबाळ नाहीये.

  अंदाजे 1 लाख लोक ऊसतोड मजुरी म्हणून काम करतात
  हाजीपूर गावातील बहुतेक महिला ऊस कापणीचे काम करतात. ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान येथील अंदाजे 1 लाख कुटुंबीय ऊस तोडणीचे काम मिळवण्यासाठी पश्चिमी महाराष्ट्रात जातात. पश्मिम महाराष्ट्र हे क्षेत्र साखर उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या सीजनमध्ये येथील भागात ऊस कापणीची खूप डिमांड आहे. महाराष्ट्रात ज्या वर्षी जास्त दुष्काळ पडतो, त्या वर्षी जास्त लोक पलायन करतात.

  मासिक पाळीमुळे कामात अडथळा येतो
  कंत्रातदार महिला आणि पुरुषांना एक युनिट माणून ऊस तोडणीचे काम देतात आणि महिला आणि पुरुषांपैकी कोणी एकदिवसदेखील सुट्टी घेतली तर त्याना 500 रूपये प्रतिदीन दंड भरावा लागतो. कंत्रातदार असे माणतात की, मासिक पाळी कामामध्ये अडथळा निर्माण करते. येथील ऊसतोड महिला सत्या भामा म्हणाल्या की, महिला मासिक पाळी थांबवण्यासाठी गर्भाषय काढून टाकतात.

  कंत्रातदार देतात हा सल्ला
  कंत्रातदार दादा पाटिल यांनी सांगितले की, मासिक पाळीमुळे महिला 1-2 दिवस सु्ट्टी घेतात आणि त्यामुळे त्याचा कामावर परिणाम पडतो. आम्हाला एका ठराविक वेळेत काम संपवणे गरजेचे असते. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, काम करताना कोणत्याच महिलेला मासिक पाळी येऊ नये. पण ते महिलांना गर्भाषय काढण्यास सांगत नाही, हा महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा निर्णय असतो. पण महिलांचे म्हणने आहे की, कंत्रातदारच त्यांना गर्भाषय काढण्याचा सल्ला देतात आणि त्यासाठी पैसे देऊन ते मजुरीमधून काढून घेतले जातात.


  गर्भाषय काढल्यावर होतात हे आजार
  ऊसतोड मजुरांवर केलेल्या सर्वेनुसास गर्भाषय काढलेल्या महिलांना नंतर अनेक गंभीर आजारांना समोरे जावे लागले. हार्मोनल इम्बॅलेंसमुळे महिलांना मानसिक आजार होतात. त्यासोबतच वजनदेखील वाढते.

 • Wombless village Hajipura from Beed District in India
 • Wombless village Hajipura from Beed District in India

Trending