आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीसमोर लग्न करण्यासाठी ठेवली अट; लग्नही झाले, परंतु अशाप्रकारे करतो आहे छळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ- उत्तरप्रदेशातील एका पोलिस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात फसवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. श्रीचंद असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असुन त्याने एका महिला पत्रकारासोबत लग्न करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करुन तिच्यासोबत  राहण्यास नकार दिला आहे. महिलेने या पोलिस अधिकाऱ्यावरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

 

पोलिस स्टेशनमध्ये जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न

महिलेने मेरठ शहरात राहणाऱ्या श्रीचंद या पोलिस अधिकाऱ्यावर तिच्यासोबत लग्न केल्यानंतर वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. बुलंद या शहरात श्रीचंद कार्यरत असुन त्याने महिलेसोबत लग्न करुन एकत्र राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काही दिवसानंतर महिलेने श्रीचंदला त्याच्या घरी घेवून जाण्याचा आग्रह केला तेव्हा त्याने नकार देऊन महिलेला घराबाहेर हाकलले. यानंतर महिेलेने श्रीचंंदविरुद्ध फसवणुक करुन लैंगिक अत्याचारा केल्याची तक्रार नोंदवली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...