आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1991 ते 2000 काळात जन्मलेल्या मुलींविषयी वैज्ञानिकांनी केला हा चकित करणारा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हीसुद्धा हाच विचार करत असाल की पुरुषच फक्त दारुडे असतात तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण काही दिवसांपूर्वीच वैज्ञानिकांनी चकित करणारा एक खुलासा केला आहे, तो म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला दुप्पट दारू पितात. वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामध्ये हे सिद्ध झाले आहे की वर्ष 1991 पासून ते 2000 या काळात जन्मलेल्या महिला तेवढीच दारू पीत आहेत जेवढी पुरुष घेतात. पिण्याच्या स्पीडमध्ये ही पिढी पुरुषांना मागे सोडत आहे. 


तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की, महिलांमध्ये सिरॉसिसने मृत्यूचे प्रमाण 57 टक्क्यांनी वाढले आहे. याउलट पुरुषांमध्ये सिरॅसिसमुळे मृत्यूचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. सिरॉसिस हा यकृत (लिव्हर)च्या कँसरनंतरच सर्वात गंभीर आजार आहे. या आजाराचा उपचार लिव्हर ट्रान्स्फरशिवाय दुसरा कोणताच नाही. या रोगामध्ये रोगामध्ये यकृत कोशिका मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि त्याठिकाणी फायबर तंतूंचे निर्माण होते. यकृताची बनावटही असामान्य होते, ज्यामुळे पोर्टल हायपरटेन्शनची स्थिती निर्माण होते.


वैज्ञानिकांनुसार, दारूच्या ओव्हरडोसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या महिलांची संख्यासुध्दा वाढत आहे. महिलांच्या शरीरात अत्यंत सीमित मात्रेमध्ये अल्कोहोल डिहाइड्रोगेनेज (एडीएच) एंझाइम निघते. हे लिव्हरमधून निघते आणि शरीरात अल्कोहोलला तोडण्याचे काम करते. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानशास्त्रचे प्रोफेसर आणि मॅकलीन हॉस्पीटल, मॅसाच्यूटएसमधील एडिक्शन सायकॉलॉजिस्ट डॉन सुगरमॅन यांच्यानुसार 'महिलांवर दारूचा प्रभाव जास्त होतो आणि यामुळे दारू पिणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त समस्या निर्माण होतात.' ज्या महिला दारू पितात त्यांना पुरुषांच्या तुलनेत जास्त मेडिकल समस्या निर्माण होतात. लिव्हर सिरॉसिस झाल्यानंतर व्यक्ती कमजोर होतो. सुरुवातीला काही खास लक्षण दिसत नाहीत परंतु हा आजार वाढतच लक्षण दिसणे सुरु होतात.

बातम्या आणखी आहेत...