आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूरोपियन महिलेने ऑनलाइन भीक मागून जमा केले 34 लाख रुपये, पतीनेच पोलिसांकडे केली तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- पोलिसांनी एका यूरोपियन महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला लोकांकडून ऑनलाइन भीग मागत होती. तिने फक्त 17 दिवसांत 34 लाख 81 हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या अनेक अकाउंटवर तिने लहान मुलांचे अनेक फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंसोबत ती कॅप्शनमध्ये लिहायची, 'माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या मुलांची जबाबदारी आता माझ्यावर आहे.' महिलेच्या माजी पतीनेच पोलिसांकडू महिलेची तक्रार केली होती. 


महिलेने अनेक ऑनलाइन बँक खाते उघडले होते
दुबई पोलिसांतील अधिकारी जमाल अल सलेम जालफने सांगितले की, महिलेने फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मुलांची फोटो पोस्ट केले होते. तिने आपल्या नावावार अनेक खाते उघडलेले होते. ती फोटोसोबत पैसे देण्याच्या विनंतीचे कॅप्शन लिहायची आणि पैसे मागायची. तुर्तास पोलिसांनी महिलेची ओळख उघढ केली नाहीये.

 

मुलांच्या पालन-पोषणाचे कारण देत महिला लोकांकडून पैसे मागायची. ती लोकांना सांगायची की, तिचा घटस्फोट झाला आहे आणि मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी तिच्यावर आहे. तिच्या माजी पतीला या गोष्टीची माहिती लागताच त्याने ई-क्राइम पोर्टलवर पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि सांगितले की, मुले त्याच्यासोबतच राहत आहेत.

 

जालफ यांनी सांगितले की, यूएईमध्ये ऑनलाइन भीक मागणे एक दंडनीय अपराध आहे. रमजानदरम्यान अशाच प्रकारे भीक मागण्यामुळे 128 जणांना अटक करण्यात आली आहे. जर कोणी ऑनलाईन भीक मागताना आढळला तर त्याला 25 ते 50 हजार दिरहमचा दंड लावला जाऊ शकतो.