आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे -शहरातील महिलेवर शेजारच्यांनी प्राणघातक हल्ला करीत मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर जवळपास महिना उलटला तरी अद्यापपर्यंत आझाद नगर पोलिस ठाण्यात पीडित महिलेची साधी फिर्याद दाखल करण्यात येत नाही.यासंदर्भात महिला आयोगाच्या दामिनी अन्याय अत्याचार केंद्राचा दरवाजा खटकावून न्यायाची अपेक्षा केली आहे.या प्रकरणी राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयकासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कैफियत मांडली आहे.
शहरातील सुभाषनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या नूतन भदाणे या महिलेला १५ नोव्हेंबर रोजी शेजारीच राहणाऱ्या चौघांनी मारहाण केली. या महिलेने त्याच दिवशी आझादनगर पोलिस ठाण्यात जखमी अवस्थेत फिर्याद दाखल करण्यासाठी धाव घेतली. या वेळी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता रुग्णालयात उपचारासाठी मेमाे देऊन पाठविले. उपचारानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी आझादनगर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या मिनतवाऱ्या केल्यानंतरही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष बाब म्हणजे पीडित महिलेची मुलगी पोलिस विभागात कार्यरत असताना गुन्हा दाखल करण्यावर कमालीची उदासीनता दाखविण्यात येत आहे. यावर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी यापूर्वी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतरही कार्यवाही होत नसल्यामुळे पीडित नूतन भदाणे यांनी राज्य महिला आयोगाच्या अधिनिस्त दामिनी महिला अन्याय अत्याचार निवारण व कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला केंद्राकडे कैफियत मांडली आहे. याप्रकरणी महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक अॅड.चंद्रकांत येशीराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य महिला आयोगाला निवेदन दिले आहे.तसेच तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.