आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाजापूर- इंदुर-देहरादून एक्सप्रेसमध्ये साधूचे सोंग करून महिलेची पर्स चोरणाऱ्या चोराचे हाल झाले. पर्स घेऊन पळून जाण्यापूर्वीच इतर महिलांनी त्याला पकडले. त्यानंतर शाजापूर रेल्वे स्टेशनवर त्याला उतरवून बेदम चोप दिला. त्याच्या पिशवीतून दारूच्या बाटल्यादेखील मिळाल्या. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
साधूच्या रूपात येऊन केली छेडछाड
इंदुर-देहरादून ट्रेन जेव्हा शाजापूर स्टेशनवर पोहचली तेव्हा लोकांचा आवाज ऐकून सगळे हैराण झाले. लोकांना लगेच कळाले की, काय प्रकार झाला आहे. उपस्थित लोकांनी सांगितले की, उज्जैन वरून शाजापूरला येणाऱ्या एका महिलेसोबत आरोपीने दारू पिऊन छेडछाड केली आणि नंतर तिची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे त्याला उडी मारता आली नाही, त्यामुळे लोकांनी त्याला पकडून पुढील स्टेशनवर उतरवले. स्टेशनवर येताच महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.