आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाता-येता विवाहितेची छेड काढायचा रोडरोमियो, तिने चिडून त्याचे गुप्तांग कापून कुत्र्यांना खाऊ घातले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, विवाहिनेते एका रोडरोमिओचे चाकूने गुप्तांग कापून कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडली आहे. जुनी डोंबिवली परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय तरुण मागील काही दिवसांपासून विवाहितेची छेड काढत होता. नेहमीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने मारहाण तरुणाला मारहाण केली. एवढेच नाही तर चाकूने त्याचे गुप्तांग कापले आणि ते कुत्र्याला खाऊ घातले.

 

नांदिवली परिसरातील एका मैदानात सोमवारी (ता.24) ही घटना घडली. जखमी तरुणावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिचे दोन मित्रांना अटक केली आहे. प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी महिला डोंबिवलीतील नांदिवली भागात राहते. महिला विवाहित असून तरुण तिची जाता येताना छेड काढत होता. विरोध केल्यानंतरही अश्लील कृत्य करत होता. सोमवारी (ता.24) तरुणाने महिलेची छेड काढली. तिच्यासोबत तो दुष्कर्म करण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात महिलेचे मित्र तेजस म्हात्रे आणि प्रतिक केनोजिया आले. दोघांनी तरुणाला पकडले. त्याचे हात पाय बांधून त्याला बेदम चोप दिला. नंतर महिलेने चाकूने तरुणाचे गुप्तांग कापून रस्त्यावर फिरणार्‍या कुत्र्याला खाऊ घातले.

 

घटनेनंतर महिलेसह तिचे दोन्ही मित्र फरार होते. मंगळवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. महिलेकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...