Home | International | Other Country | Women claims that she experienced Hell after death and getting alive again

मृत्यूनंतर जीवंत झाली महिला, सांगितली नरकात जाण्याची कहाणी, म्हणाली-एक मोठा राक्षस मोठ्याने नाव पुकारत होता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 02:35 PM IST

30 वर्षांपूर्वी औषधांच्या ओव्हर डोसमुळे तिचा मृत्यू झाला होता.पण काही वेळाने ती पुन्हा जीवंतही झाली होती.

 • इंग्लंड - मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर पुन्हा जीवंत होऊन आपले अनुभव सांगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव म्हणजे ब्रिटनची किम. किमने मृत्यूनंतर नरकात गेल्याचा अनुभव सांगितला आहे. किम म्हणाली की, 30 वर्षांपूर्वी औषधांच्या ओव्हर डोसमुळे तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पण काही वेळाने ती पुन्हा जीवंत झाली. पण मृत झाल्यानंतर तिने अत्यंत भयावह अनुभव घेतल्याचा दावा तिने केला आहे.


  ओरडत होता राक्षस..
  किम म्ङणाली की, तिला अचानक झोप लागल्यासारखे झाले. काही काळाने तिचे शरीर हलके पडले. अचानक एका दैत्याने तिला आवाज दिला. ती घाबरली. किम म्हणाली, तो एक मोठा राक्षस होता. तो मोठ्याने ओरडत होता. हे सर्व 30 वर्षांपूर्वी घडले पण ते एवढे भयावर होते की, मी ते आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे ती म्हणाली. डॉक्टरांच्या मते किम चार दिवस कोमामध्ये होते. तर किम म्हणाली की, मी जो अनुभव केला त्यानुसार मी काही क्षण शरीराबाहेर असल्याचे अनुभवले. त्यावेळी जणू वेळच थांबला होता, असे ती म्हणाली.

  मी ओरडू शकत नव्हते, आणि पळूही शकत नव्हते
  किम पुढे म्हणाली की, तो राक्षस माझ्या जवळ आला तेव्हा मी शून्यात गेले होते. माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता किंवा मला पळताही येत नव्हते. मला त्याठिकाणाहून पळून जायचे होते. तो वारंवार माझ्याभोवती फिरत होता. माझे हात कापले जात होते, पुन्हा जागेवर येत होते. असे वारंवार होत होते. मग किडे माझे शरीर खात आहे असे जाणवले, त्यानंतर समजले की हेच नर्क आहे.


  डॉक्टर्स म्हणाले, असे होऊ शकते पण सिद्ध करता येणार नाही
  न्यूयॉर्कचे डॉक्टर सॅम पर्निया यांनी या दाव्याबाबत म्हटले की, अनेक लोक त्यांनी मृत्यू अनुभवल्याचे दावे करतात. हे सर्व कोमात जाणाऱ्या किंवा क्लिनिकली डेड लोकांबरोबर होतात हे आम्हाला मान्य आहे. पण अनेक प्रकरणांत हा फक्त विचारांचा खेळ असतो.

 • Women claims that she experienced Hell after death and getting alive again
 • Women claims that she experienced Hell after death and getting alive again

Trending