आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women Climb On Tree For Suicide; But She Hung The Throat And Sat There For 5 Hours

आत्महत्येसाठी महिला चढली ५० फूट उंच झाडावर; परंतु फास गळ्यात टाकून ५ तास तेथेच बसून राहिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा - मध्य प्रदेशच्या खंडवा येथील मुंदीनगरमध्ये एक महिला आत्महत्या करण्यासाठी ५० फूट उंच झाडावर चढली. तसेच गळ्यात फास टाकून सुमारे ५ तासांपर्यंत तेथेच बसून राहिली. लाेकांनी तिला खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु तिने कुणाचेही ऐकले नाही. त्यामुळे या प्रकरणात पाेलिसांना मध्यस्थी करावी लागली. पाेलिसांनी  हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीने तिला खाली उतरवले. सावित्रीबाई असे या ४५ वर्षीय महिलेचे नाव असून, ती २ वर्षांपासून एके ठिकाणी घरकाम करते. मात्र, कामावरून मालकाने जबर मारहाण केल्याने तिने हे पाऊल उचलले. तिच्या तक्रारीवरून संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...