आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीला माहेरी न पाठवल्यामुळे विवाहितेने केली आत्महत्या, 8 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : संक्रांतीसाठी माहेरी न पाठवल्याच्या कारणावरून ८ महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात रविवारी पहाटे घडली.

पूजा विकास बिक्कड (२५, रा. धानोरा रोड, बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. एप्रिल २०१९ मध्ये पूजा व विकास यांचा विवाह झाला होता. यंदाची संक्रांत ही पूजाची पहिली संक्रांत असल्याने आपल्याला माहेरी पाठवावे असे ती सासरच्यांना सांगत होती तर सासरी संक्रांत साजरी करण्याचा सासरच्यांचा आग्रह होता. यातून पूजा काही दिवसांपासून नाराज होती. रविवारी पहाटे पूजाने घरी वायरच्या सहाय्यान गळफास घेत आत्महत्या केली. शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, मीना तुपे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

पंचनामा करण्यासाठी ताटकळले पोलिस

जिल्हा रुग्णालयात मृतदेह सकाळी आणल्यानंतर कर्मचाऱ्याने शवविच्छेदन गृहात ठेवला व कुलूप लावून घेतले. पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे पंचनाम्यासाठी गेल्या असता खाेली बंद होती. सरकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शवविच्छेदनगृह उघडून देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे पोलिस पंचनाम्यासाठी ताटकळले होते.