Home | National | Other State | women committed sucide by hanging

सूर्य उगताच गावकऱ्यांनी पाहिले इतके भयानक दृश्य; अवघ्या काही तासांपूर्वीच झाला होता पती-पत्नीचा वाद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 05:45 PM IST

शिलाई करून शिकवायची 3 मुलांना.

  • पाटणा - बिहारच्या गया जिल्ह्यात सोमवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह तिच्याच घराच्या पिलरला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती यशवंतला संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. या हत्येसाठी पोलिसांनी पीडितेच्या दीराला सुद्धा अटक केली आहे. महिलेच्या तीन मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक घराबाहेर पडले. तेव्हाच सर्वांना हे भयंकर दृश्य दिसून आले.

    काही तासांपूर्वी झाला होता वाद

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या अवघ्या काही तासांपूर्वी पत्नीचे पतीसोबत भांडण झाले होते. पती यशवंतने शेतात सिंचनासाठी पंप खरेदी केला होता. हाच पंप त्याने वापरण्यासाठी गावकऱ्याला दिला होता. यावरूनच पती-पत्नीमध्ये वाद झाला. पीडित महिलेच्या भावाने लावलेल्या आरोपानुसार, या भांडणानंतर यशवंतने त्याच्या पत्नीचा खून करून आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिलरला लटकून ती आत्महत्या कशी करू शकते या प्रश्नावरून पोलिसांना तिच्या पतीला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून याबाबत सविस्तर तपास सुरू आहे.

Trending